Rahul Gandhi : लोकसभा निवडणूकीची रनधुमाळी सुरू झाली आहे. भाजप आणि काँग्रेसने आपापल्या काही उमेदवारांची घोषणा केली आहे. असे असताना तपास यंत्रणांकडून काँग्रेस पक्षाची सर्व बँक खाती गोठवण्यात आली आहेत आणि पक्ष लोकसभा निवडणुकीत प्रचार करू शकत नाही, असे काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) पत्रकार परिषेत म्हणाले.
काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी (Soniya Gandhi) आणि विद्यमान अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) तसेच राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची संयुक्त पत्रकार परिषद गुरुवारी पार पडली. त्यावेळी काँग्रेस नेत्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दोन महिने आधी काँग्रेस पक्षाची बँक खाते गोठवली आहे. द्वेषाने भरलेल्या ‘राक्षसी शक्तीने’ लोकशाहीची हत्या करण्यासाठी काँग्रेसचे बँक खाते गोठवली असल्याची टीका खासदार राहुल गांधी यांनी केली.
पक्षाच्या आर्थिक अडचणींवर बोलताना राहुल गांधी म्हणाले, काँग्रेस पक्षाची सर्व खाती गोठवण्यात आली आहेत, आम्ही लोकसभा निवडणुकीत प्रचार करू शकत नाही. जाहिरात करू शकत नाही. पुढे ते म्हणाले की, ही काँग्रेस पक्षाची बँक खाती गोठवली जात नाही, ही भारतीय लोकशाही गोठवली जात आहे. “सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून, आम्ही काहीही करू शकत नाही आमच्या नेत्यांना कुठेही पाठवू शकत नाही. हा लोकशाहीवर हल्ला आहे.
राहुल गांधी म्हणाले, “न्यायिक संस्था गप्प आहेत, प्रसारमाध्यमे गप्प आहेत आणि निवडणूक आयोग, ज्यांचे काम निष्पक्ष निवडणुका घेणे आहे, तेही या ‘गुन्हेगारी कारवाई’वर गप्प आहेत.” ते म्हणाले, “भारत ही लोकशाही आहे असे म्हणणे खोटे आहे. आज भारतात लोकशाही नाही. भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे ही कल्पना खोटी आहे. पूर्ण खोटी आहे. देशातील २० % जनतेने आम्हाला मत दिले, मात्र आम्ही त्यांच्यासाठी २ रूपयेसुद्धा खर्च करू शकत नाही. निवडणुकीत आम्हाला अडचणीत आणण्यासाठी हे षडयंत्र रचण्यात आले आहे.
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले, “काँग्रेसला ३० वर्षे जुन्या प्रकरणात २०० कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे आणि नियमांचे उल्लंघन करून १४ लाख रुपयांच्या अनियमिततेचा आरोप आहे.” ते म्हणाले, “सर्वात मोठा विरोधी पक्ष ‘आर्थिक’ ‘ओळख’ पुसून टाकण्याचे प्रयत्न सुरू असून लोकशाहीच्या रक्षणासाठी निर्माण झालेल्या संस्थांचा तमाशा दिसत आहे.
सोनिया गांधी म्हणाल्या, “आम्ही आज जो मुद्दा उपस्थित करत आहोत तो अत्यंत गंभीर आहे. हा मुद्दा केवळ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसवरच नाही तर लोकशाहीलाही प्रभावित करतो. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्याचा पंतप्रधानांकडून पद्धतशीर प्रयत्न केला जात आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत समतोल राखण्यासाठी काँग्रेसला बँक खाती वापरण्याची परवानगी द्यावी, असेही सोनिया गांधी म्हणाल्या.
मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, कोणत्याही लोकशाहीसाठी निष्पक्ष निवडणुका आवश्यक असतात, तसेच सर्व राजकीय पक्षांना समान संधी मिळणेही आवश्यक असते. “जो कोणी सत्तेवर आहे त्याची मीडियावर सत्ता आहे आणि आयटी, ईडी, निवडणूक आयोग आणि इतर स्वायत्त संस्थांवर नियंत्रण आहे, असे होऊ नये,” असे काँग्रेस अध्यक्ष म्हणाले. तसेच काँग्रेसला समान पातळीवर निवडणूक लढवण्यापासून रोखण्यासाठी सत्ताधारी पक्षाकडून हा ‘धोकादायक खेळ’ खेळला जात असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला.
हे ही वाचा :
राज ठाकरे यांना महायुतीत घेतल्याने काहीही फरक पडणार नाही – रामदास आठवले
मोठी बातमी : राज्यातील ‘या’ भागात भुकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
शिरूर लोकसभा मतदारसंघात “या” दोन उमेदवारांमध्ये सामना जवळपास निश्चित
Mirzapur 3 : मिर्झापूरच्या तिसऱ्या सिझनच्या रिलीज संदर्भात महत्वाची माहिती समोर
ब्रेकिंग : प्रकाश आंबेडकर यांचा लेटर बाँब, महाविकास आघाडी नव्हे तर ‘या’ पक्षाकडे युतीचा प्रस्ताव
ब्रेकिंग : राज ठाकरे आणि अमित शहांची भेट, राज ठाकरें लवकरच मोठा निर्णय घेणार