Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना दारू घोटाळा प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळू शकलेला नाही. दिल्ली उच्च न्यायालयात नवी याचिका दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयात आज सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने केजरीवाल यांना अटकेतून दिलासा दिलेला नाही.
ईडीकडून अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना तब्बल ९ समन्स देण्यात आले होते. मात्र अरविंद केजरीवाल हे हजर झाले नाही. या पार्श्वभुमीवर आज गुरूवारी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. त्यावेळी न्यायालयाने केजरीवाल यांना अटकेपासून कोणतीही सुरक्षा देण्यात आलेली नाही. यापूर्वी केजरीवाल यांनी न्यायालयाला सांगितले होते की ते अंमलबजावणी संचालनालयासमोर हजर राहण्यास तयार आहेत, परंतु तपास यंत्रणा त्यांना अटक करणार नाही याची खात्री त्यांनी दिली पाहिजे.
आज दुपारी न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर आता ईडीचे अधिकारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या घरी पोहोचल्याची माहिती आहे. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर केजरीवाल यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. अशात त्यांना अटक होणार का हे पहावे लागणार आहे.
ईडीकडून कठोर कारवाई करण्याबाबत कोणताही आदेश देण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला. मुख्यमंत्र्यांच्या याचिकेवर ईडीला नोटीस बजावून उत्तर मागितले आहे. केजरीवाल यांनी ईडीच्या ९ व्या समन्सला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. ईडीने १७ मार्च रोजी केजरीवाल यांना ९ वे समन्स पाठवले होते. या प्रकरणाची पुढील सुनावणी २२ एप्रिल रोजी होणार आहे.
सध्या दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया हे दारू धोरण प्रकरणी तुरुंगात आहेत. तर आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनाही गेल्या वर्षी अटक करण्यात आली होती.


हे ही वाचा :
राज ठाकरे यांना महायुतीत घेतल्याने काहीही फरक पडणार नाही – रामदास आठवले
मोठी बातमी : राज्यातील ‘या’ भागात भुकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
शिरूर लोकसभा मतदारसंघात “या” दोन उमेदवारांमध्ये सामना जवळपास निश्चित
Mirzapur 3 : मिर्झापूरच्या तिसऱ्या सिझनच्या रिलीज संदर्भात महत्वाची माहिती समोर
ब्रेकिंग : प्रकाश आंबेडकर यांचा लेटर बाँब, महाविकास आघाडी नव्हे तर ‘या’ पक्षाकडे युतीचा प्रस्ताव
ब्रेकिंग : राज ठाकरे आणि अमित शहांची भेट, राज ठाकरें लवकरच मोठा निर्णय घेणार