नवी दिल्ली : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक राष्ट्र, एक निवडणूक या संकल्पनेवर जोरदार टीका केली आहे. अनेक राज्यांनी बनलेले भारत हे एक संघराज्य असून, ‘एक देश, एक निवडणूक’ ही संकल्पना भारतीय संघराज्यासह सर्व राज्यांवर हल्ला असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली आहे.
देशात लोकसभा आणि सर्व राज्यांचे निवडणुका एकाच वेळी घेण्याची शक्यता असून त्यासाठी केंद्र सरकारने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती केली आहे. यावर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘एक देश, एक निवडणूक’ ही कल्पना म्हणजे भारतीय संघराज्य आणि देशातील सर्व राज्यांवर हल्ला आहे. हा इंडियावर हल्ला आहे, त्यावर अशी संकल्पना लादून त्यांची स्वायत्ताच सरकारने धोक्यात आणली आहे, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ‘एक्स’वरील नमूद केले आहे, की एक देश, एक निवडणूक ही उच्चस्तरीय समिती एक औपचारिक कृती आहे. यासंदर्भात निवडलेली वेळ अत्यंत संशयास्पद असून, त्याच्या संदर्भातील अटींनी आधीच शिफारसी निश्चित केल्या आहेत.