Home ताज्या बातम्या Congress loksabha Candidates : काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Congress loksabha Candidates : काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Congress announced first list of candidates for Lok Sabha elections

Congress loksabha Candidates : काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक (Congress) समितीच्या 7 मार्चला झालेल्या बैठकीत अनेक मोठी नावे निश्चित करण्यात आली. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. Congress loksabha Candidates list

दोन दिवसांपुर्वीच भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत एकूण 197 उमेदवारांची नावे आहेत. यानंतर आता काँग्रेसने पहिली उमेदवार यादी जाहीर केली. यात 39 उमेदवारांची नावे आहेत.

या यादीत राहुल गांधी (Rahul Gandhi), शशी थरूर (Shashi Tharoor), भूपेश बघेल, केसी वेणुगोपाल, व्हिन्सेंट पाला अशा दिग्गज नेत्यांची नावे असून यात दिल्ली, छत्तीसगड, तेलंगणा, मणिपूर, मेघालय, त्रिपुरा, कर्नाटक, केरळ, सिक्किम आणि लक्षद्वीप इत्यादी राज्यांच्या उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे.

काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर काँग्रेसने पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी काँग्रेसच्या पहिल्या यादीतील 39 उमेदवारांच्या नावाची घोषणा झाली. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi), यांना केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

तसेच, शशी थरूर यांना तिरुअनंतपुरम, भूपेश बघेल यांना राजनांदगावमधून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते केसी वेणुगोपाल यांना अलाफूजा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

दरम्यान, भाजपने जाहिर केलेल्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश नव्हता, तसेच काँग्रेसच्या पहिल्या यादीत देखील महाराष्ट्र्तील एकही उमेदवार नाही.

हे ही वाचा :

मोठी बातमी : मंत्रालयात भीषण आग, अनेक महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक

पुण्यात एका अफवेने मध्यरात्री तणावाचे वातावरण, पोलिसांचा चोख बंदोबस्त

ब्रेकिंग : सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांची घोषणा

ईडीच्या कारवाईनंतर रोहित पवार भाजपात जाणार का? रोहित पवारांची पोस्ट चर्चेत

ब्रेकिंग : रोहित पवार यांच्यावर ईडीची मोठी कारवाई; शरद पवार गटाला झटका

मोठी बातमी : मराठा आरक्षणा संदर्भात राज्य सरकारला न्यायालयाचे महत्वाचे निर्देश

हो मला आदित्यला मुख्यमंत्री करायचंय… उद्धव ठाकरे यांचे मोठे विधान

Exit mobile version