Home ताज्या बातम्या Maratha Reservation : मराठा आरक्षणा संदर्भात राज्य सरकारला न्यायालयाचे महत्वाचे निर्देश

Maratha Reservation : मराठा आरक्षणा संदर्भात राज्य सरकारला न्यायालयाचे महत्वाचे निर्देश

Maratha Reservation: Important directions of the court to the state government regarding Maratha reservation

Maratha Reservation : मराठा आरक्षणा (Maratha Reservation) संदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्य शासनानं मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिले आहे, मराठा आरक्षण कायद्याला विरोध करणाऱ्या याचिकेवर उच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली आहे. यावेळी मराठा आरक्षणानुसार भरती प्रक्रिया आणि शैक्षणिक दाखल्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाकडून सरकारला महत्त्वाचे निर्देश देण्यात आले आहेत. Important directions of the court to the state government regarding Maratha reservation

मराठा आरक्षण कायद्याला विरोध करणाऱ्या याचिकेवर उच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली आहे. त्यावेळी, मराठा आरक्षणानुसार कुठलीही भरती किंवा शैक्षणिक दाखले देताना ते कोर्टाच्या अंतिम निर्णयावर अवलंबून राहतील हे लक्षात ठेवा असे स्पष्ट निर्देश मुंबई उच्च न्यायालयाकडून राज्य सरकारला देण्यात आले आहेत. वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी मराठा आरक्षणाविरोधातील दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाचे हे निर्देश दिले आहे.

दरम्यान, राज्य सरकारनं नव्यानं जाहीर केलेली भरती प्रक्रिया आणि शैक्षणिक दाखल्यांच्या जाहिरातीविरोधात डॉ. जयश्री पाटील यांची हायकोर्टात दिवाणी रिट याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यांच्या वतीनं गुणरत्न सदावर्ते हे युक्तीवाद करत आहेत.

मराठा आरक्षणाविरोधात गुणरत्न सदावर्तेंनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात मंगळवारपर्यंत तहकूब करण्यात आली.

हे ही वाचा :

मोठी बातमी : घरगुती गॅस च्या किंमती तब्बल इतक्या रुपयांनी होणार कमी

Indian Bank : इंडियन बँक अंतर्गत विविध पदांसाठी भरती

CBSE : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत विविध पदांसाठी भरती

ब्रेकिंग : सीएनजीच्या दरात मोठी कपात, सर्वसामान्यांना दिलासादायक

सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ, आजवरचे सर्व रेकॉर्ड मोडले.

ऑटोरिक्षा व टॅक्सी चालकांविरूद्ध १८६५ तक्रारी प्राप्त; ७३९ परवाने निलंबित, वाचा काय प्रकरण

Exit mobile version