Home ताज्या बातम्या Sheikh Sallah Dargya : पुण्यात शेख सल्लाह दर्ग्यावर कारवाईची अफवा, शहरात मध्यरात्री...

Sheikh Sallah Dargya : पुण्यात शेख सल्लाह दर्ग्यावर कारवाईची अफवा, शहरात मध्यरात्री तणाव

Sheikh Sallah Dargya: Rumors of action on Sheikh Sallah Dargya in Pune, midnight tension in the city

Pune rumor news : पुणे शहरात एका अफवेमुळे मध्यरात्री तणावांचे वातावरण निर्माण झाले होते. पुण्यात शुक्रवारी मध्यरात्री शेख सल्लाह दर्ग्यावर (Sheikh Sallah Dargya) कारवाई होणार अशी अफवा पसरली होती. या अफवेमुळे पुण्यातील कसबा पेठ (Kasbah Peth) परिसरात मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव एकवटले होते. त्यामुळे शहरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. Rumors of action on Shaikh Salah Dargah in Pune

पुणे शहरातील कसबा पेठ येथील शेख सल्लाह दर्गा (Sheikh Sallah Dargya) येथे अनधिकृत असणाऱ्या अतिक्रमनावर करवाई होणार अशी अफवा मध्यरात्री पसरली होती. या अफवेनेनंतर काही वेळातच दर्ग्या पुढे आणि कुंभारवाडा परिसरात शेकडो लोक जमले होते. अचानक जमलेल्या नागरिकांनी घोषणा बाजीला सुरू केली होती. कारवाईच्या खोट्या अफवेनंतर काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

तणावा दरम्यान, पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल यांनी भर गर्दीत गाडीवर चढून जमावाला शांत राहण्याचे आवाहन केले. तसेच मज्जित परिसरामध्ये कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नाही असे आश्वासित करण्यात आले. तणावाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त वाढवण्यात आला.

दरम्यान, पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की, परिस्थिती पूर्ण नियंत्रणात आहे. कुणी तरी अफवा पसरवली आहे की इथे कारवाई होणार. पण असं काही नाही. कुणी ही अफवांवर विश्वास ठेवू नये.

हे ही वाचा :

ईडीच्या कारवाईनंतर रोहित पवार भाजपात जाणार का? रोहित पवारांची पोस्ट चर्चेत

ब्रेकिंग : रोहित पवार यांच्यावर ईडीची मोठी कारवाई; शरद पवार गटाला झटका

मोठी बातमी : मराठा आरक्षणा संदर्भात राज्य सरकारला न्यायालयाचे महत्वाचे निर्देश

हो मला आदित्यला मुख्यमंत्री करायचंय… उद्धव ठाकरे यांचे मोठे विधान

Exit mobile version