Home ताज्या बातम्या Uddhav Thackeray : हो मला आदित्यला मुख्यमंत्री करायचंय… उद्धव ठाकरे यांचे मोठे...

Uddhav Thackeray : हो मला आदित्यला मुख्यमंत्री करायचंय… उद्धव ठाकरे यांचे मोठे विधान

Uddhav Thackeray : Yes I want to make Aditya the Chief Minister... Uddhav Thackeray's big statement

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना त्यांच्या मुलाला म्हणजेच आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करायचं अशी टीका केंद्रीय गृहमंत्री आमित शाह (Amit Shah) यांनी घराणेशाहीवरुनच उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) केली होती. या टीकेवर आता उद्धव ठाकरे यांनी प्रत्यूत्तर दिले आहे. Yes I want to make Aditya Chief Minister Uddhav Thackeray

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घराणेशाहीच्या राजकारणाला प्रोत्साहन देण्याच्या आरोपाला ठाकरे यांनी उत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, हो मला करायचे आहे आदित्यला मुख्यमंत्री. (Aditya Thackeray) पण त्यासाठी त्याला तुम्ही (नागरिकांनी) निवडून दिले पाहिजे. असे आवाहन करत जय शाह यांचे नाव घेत टीकाही केली.

ठाकरे पुढे म्हणाले की, जय शाहचे क्रिकेटचे काय योगदान आहे? महाराष्ट्रातील मॅच गुजरातला नेण्यासाठी तुम्ही जय शाहाला अध्यक्ष केले. आमचे सरकार का पडले? कारण मी महाराष्ट्र लुटू देत नव्हतो. मात्र आमच्यातले मिंधे, त्यांच्यासोबत पाय चाटत गेले. माझा गुजरातला विरोध नाही. पण तुम्ही गुजरात आणि भारतात भिंत उभी करत आहेत”, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी यावेळी केला.

दरम्यान, इंडिया ही आघाडी वगैरे काही नाही. ही आघाडी म्हणजे काही सत्तालोलुप पक्षांचं एकत्र येणं आहे. या लोकांना आपल्या मुलांना, पुतण्याला, भाच्याला मुख्यमंत्री किंवा मंत्री किंवा पंतप्रधान बनवायचं आहे. राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत हे सोनिया गांधी यांचं लक्ष्य आहे. तर उद्धव ठाकरेंना त्यांचा मुलगा मुख्यमंत्री व्हावा असं वाटतं आहे. असा टीका अमित शहा यांनी केली होती.

हे ही वाचा :

मोठी बातमी : मराठा आरक्षणा संदर्भात राज्य सरकारला न्यायालयाचे महत्वाचे निर्देश

मोठी बातमी : घरगुती गॅस च्या किंमती तब्बल इतक्या रुपयांनी होणार कमी

Indian Bank : इंडियन बँक अंतर्गत विविध पदांसाठी भरती

CBSE : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत विविध पदांसाठी भरती

ब्रेकिंग : सीएनजीच्या दरात मोठी कपात, सर्वसामान्यांना दिलासादायक

सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ, आजवरचे सर्व रेकॉर्ड मोडले.

Exit mobile version