Sunday, May 19, 2024
Homeजिल्हाCITU तर्फे आशां व गटप्रवर्तकांचे भंडारा जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन

CITU तर्फे आशां व गटप्रवर्तकांचे भंडारा जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन

बेमुदत संप चालूच राहणार – आशा वर्कर

भंडारा : CITU तर्फे आशा व गटप्रवर्तक 15 जून रोजी भंडारा जिल्ह्यात बेमुदत संप चालू केला आहे. तसेच भंडारा जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन सुरू आहे.

आज मंत्रालयात झालेली बैठक निष्फळ ठरली. त्यामुळे काल पासून राज्यातील सुमारे 70 हजार आशा कर्मचारी व गटप्रवर्तकांचा बेमुदत संप चालू राहणार आहेत. आशा कर्मचारी व गटप्रवर्तक यांना सरकारी कर्मचार्‍यांचा दर्जा द्यावा, तोपर्यंत18 हजार रुपये किमान वेतन आशांना दरमहा 18,000 रुपये, गटप्रवर्तकांना दरमहा 22,000 रुपये याप्रमाणे किमान वेतन मिळावे व कोविड महामारीत केलेल्या कामासाठी प्रोत्साहन भत्ता शहरी व ग्रामीण भागातील आशा आणि गटप्रवर्तक यांना मिळावा, निश्चित मानधनात या काळात कपात करण्यात आली आहे ती परत द्यावी, सर्व मोबदल्याच्या थकीत रकमा तातडीने अदा करण्यात याव्यात, आशा कर्मचाऱ्यांना आरोग्य सेवेत भरती करताना प्राधान्य देण्यात यावे, या प्रमुख मागण्या आहेत.

आंदोलनाचे नेतृत्व राजेंद्र साठे, सुदर्शन हुमणे, सुनंदा बसेशंकर, सुनीता डाकरे, महानंदा बसेशंकर, मंगला बागडे, लक्ष्मी ठाकूर, कोमेश्वरी गणवीर यांंनी केले. मोठ्या संख्येने आशा व गटप्रवर्तक सहभागी झाल्या होत्या.

 

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय