Sunday, May 19, 2024
Homeजिल्हाCITU तर्फे आशा व गटप्रवर्तकांचे संविधान चौकात भर पावसात धरणे आंदोलन, बेमुदत...

CITU तर्फे आशा व गटप्रवर्तकांचे संविधान चौकात भर पावसात धरणे आंदोलन, बेमुदत संप चालूच ठेवू – आशा वर्कर्स

आशां वर्करांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन चालूच राहणार – राजेंद्र साठे

नागपूर : आशा व गटप्रवर्तक आज 15 जून रोजी नागपुरात संविधान चौक येथे बेमुदत संपावर बसलेले आहेत. मुसळधार पावसात आंदोलन करीत आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत बेमुदत संप करू असा इशारा आशा वर्करांनी सरकारला दिलेला आहे. 

आशा ना दरमहा राज्य व केंद्र सरकारच्या वतीने  2-2 हजार रुपये मिळतात मात्र महाराष्ट्रत बहुसंख्य ठिकाणी 1650 रुपये जमा होत आहेत. कपात होत आहे. राज्यात आरोग्यवर्धिनी चे काम सुरू असतांना आरोग्य उपकेंद्रे मध्ये(CHO) समूह आरोग्य अधिकारी नियुक्त नसल्यास केलेला कामाचा मोबदला आशा ना मिळत नाही. 

आशा व गट प्रवर्तक ना मार्च 2020 पासून कोरोना काम करून घेतले जात आहे. कोरोना कामामुळे आशा ना इतर 72 कामे करण्यास वेळ मिळत नाही. आशा ना फक्त कामाचा मोबदला दिला जातो. त्यामुळे आशांचे नुकसान होत आहे. केंद्र सरकार आशा ना फक्त दरमहा 1 हजार रुपये म्हणजे दिवसाला 33 रु रोज 8 ते 12 तास काम करून देत आहे. इतर कर्मचाऱ्यांना 5 हजार रुपये प्रोत्साहन भत्ता दरमहा देत आहे. अल्प मानधन वर काम करणाऱ्या आशा व गट प्रवर्तक वर अन्याय का ? जे काम आशा करतात त्या कामाचे रिपोर्टिंग गट प्रवर्तक करावे लागते. गट प्रवर्तक ना सुध्दा कोरोना कामासाठी ऑनलाइन काम, कोरोना सेंटर वर 8 तास ड्युटी लावली जात आहे. म्हणून कोरोना कामाचा प्रोत्साहन भत्ता आशा व गट प्रवर्तक ना प्रतिदिन 500 रु द्या, अशी मागणी करण्यात आली. 

३१ मे रोजी संपाची नोटीस दिल्यास नंतर सुद्धा दीड वर्षापासून कोरोना कामात राबणाऱ्या आशा व गट प्रवर्तक किती वाट बघणार ? संपाशिवाय पर्याय नसल्यामुळे राज्यभर आशा व गट प्रवर्तक यांचे कामबंद आंदोलनं होत आहे. CITU नागपूर तर्फे हजारो आशा वर्कर्स व गटप्रवर्तक तसे प्रीती मेश्राम, रंजना पौनीकर, पौर्णिमा पाटील, अंजु चोपडे, मंगला बागडे यांचे नेतृत्वात धरणे आंदोलन केले. जेव्हा पर्यंत मागण्या मान्य होणार नाही तेव्हा पर्यंत बेमुदत संप चालूच राहणार, अशी माहिती सीटूचे अध्यक्ष राजेंद्र साठेनी दिली.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय