Wednesday, November 13, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडChinchwad Vidhan Sabha 2024 : सकल ब्राम्हण समाजाचा महायुतीचे उमेदवार शंकर जगताप...

Chinchwad Vidhan Sabha 2024 : सकल ब्राम्हण समाजाचा महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांना जाहीर पाठींबा

हिंदुत्ववादी विचारसरणीला पाठींबा देण्यासाठी महायुतीला मतदान करण्याचे समाजाला आवाहन (Chinchwad Vidhan Sabha 2024)

संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जगताप यांना दिले पाठींब्याचे पत्र

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : पिंपरी चिंचवड शहर सकल ब्राम्हण समाजाच्या वतीने भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – रिपाइं (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांना जाहीर पाठींबा दिला आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जगताप यांची भेट घेत त्यांना पाठींब्याचे पत्र दिले. (Chinchwad Vidhan Sabha 2024)


याप्रसंगी भाजपचे शहर कार्याध्यक्ष शत्रुघ्न काटे, माजी नगरसेविका निर्मला कुटे, माजी नगरसेविका सुनीता तापकीर, उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदाताई भिसे, सकल ब्राम्हण समाजाचे समन्वयक परीक्षित कुलकर्णी, डॉ. शर्वरी येरगट्टीकर, अनिल शर्मा, रोहन जोशी, अभय ओरपे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, सदस्य व ब्राम्हण समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना समन्वयक कुलकर्णी म्हणाले की, हिंदुत्वाच्या मुद्यावर ब्राह्मण समाजाने कायमच भाजपला साथ दिलेली आहे. राज्यातील सध्याचे वातावरण पाहता हिंदुत्वाचा मुद्दा भाजपने केंद्रस्थानी ठेवला आहे व हीच ब्राह्मण समाजाची देखील भूमिका आहे. आम्ही खालील सर्व ब्राह्मण संस्था, संघटनांचे पदाधिकारी हिंदुत्वाचा जयघोष व्हावा या हेतूने पिंपरी चिंचवड शहरातील भारतीय जनता पक्ष महायुतीच्या चिंचवड विधानसभेतील शंकर जगताप, पिंपरी विधानसभेत आण्णा बनसोडे आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महेश लांडगे या तिघांनाही जाहीर संपूर्ण पाठिंबा देत आहोत. (Chinchwad Vidhan Sabha 2024)


हिंदुत्वाची पताका आपल्या खांद्यावर घेवून अधिक सकारात्मक काम करणारा राष्ट्रसमर्पित असलेला ब्राह्मण समाज आहे. या समाजाप्रती अत्यंत चांगली अशी सकारात्मक वागणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. त्यात सुरुवातीला खुल्या प्रवर्गासाठी अमृत महामंडळ दिले तर नुकतेच ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ हे स्वतंत्र महामंडळ देखील दिले आहे. भविष्यातही महायुतीचे सरकार ब्राम्हण समाजाच्या उन्नतीसाठी कटिबद्ध असेल, असा विश्वास मी देतो.

शंकर जगताप
(महायुतीचे उमेदवार

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

छगन भुजबळांना मुख्यमंत्री न करण्यामागचं शरद पवारांचं धक्कादायक स्पष्टीकरण

धनंजय महाडिक यांच्यावर गुन्हा दाखल; लाडकी बहिण योजनेवर वादग्रस्त वक्तव्य

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांच्या हस्ते भाजपच्या संकल्पपत्राचे प्रकाशन जाहीर

नताशा स्टँकोविक हिचा हार्दिक पांड्यासोबतच्या नात्याविषयी नवा खुलासा

शरद पवार गटाचे उमेदवार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण; विवस्त्र करून अश्लील व्हिडीओ शूट

गुन्हेगारी संपवू ,बेरोजगारी संपवू, विकासाचे सर्व प्रश्न हाताळू – रोहित पवार

मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य

धक्कादायक : सांगलीत कुऱ्हाडीने वार करून भाजप नेत्याची निर्घृण हत्या

अकोल्यातील सभेत पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा; गरिबांना पक्के घर देणार

महायुतीचे सरकार येताच पहिले काम ‘हे’ करणार? नरेंद्र मोदींची घोषणा

फॉर्म भरुनही पैसे आले नाही ; महत्वाची माहिती समोर

संबंधित लेख

लोकप्रिय