Sunday, April 28, 2024
Homeराज्यदूषित पाणी प्यायल्याने मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहिर केली...

दूषित पाणी प्यायल्याने मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहिर केली मदत

अमरावती, दि.९ : अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरातील पाचडोंगरी आणि कोयलारी गावात खुल्या विहिरीतील दूषित पाणी प्यायल्यामुळे ५० जणांना अतिसाराची लागण झाली. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहे. तर या दुर्घटनेत तीन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून प्रशासन खडबडून जागी झाले आहे.

मेळघाटमध्ये दूषित पाणी प्यायल्यामुळे ३ नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर आरोग्य यंत्रणा व जिल्हा प्रशासन देखील सतर्क झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संवाद साधत दूषित पाण्याने बाधा झालेल्या नागरिकांना तातडीने चांगले उपचार मिळवून द्यावेत. आवश्यक असल्यास खासगी रूग्णालयात दाखल करावे, असे निर्देश दिले आहे. तसेच, या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूषित पाणी पिऊन आजारी पडलेल्यांना शासकीय खर्चाने वैद्यकीय उपचार देण्याचे देखील निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय