Friday, March 29, 2024
Homeआंतरराष्ट्रीयश्रीलंकेतील आंदोलकांनी राष्ट्रपती भवन घेतले ताब्यात, राष्ट्रपती राजपक्षे घर सोडून पळाले

श्रीलंकेतील आंदोलकांनी राष्ट्रपती भवन घेतले ताब्यात, राष्ट्रपती राजपक्षे घर सोडून पळाले

कोलंबो : श्रीलंकेतील आर्थिक परिस्थिती (Sri Lanka Economic Crisis) अधिक बिकट होत चालली आहे. वाढत्या महागाईने त्रस्त झालेले नागरिक अधिक आक्रमक झाल्याचे आज बघायाला मिळाले. श्रीलंकन नागरिक थेट राष्ट्रपती भवनाचे दार तोडून आत पोहचले.

श्रीलंकेतील वाढत्या महागाईमुळं राष्ट्रपती गोटाबया राजपक्षेच्या राजीनाम्यासाठी देशातील विविध ठिकाणी सरकारविरुद्ध रॅली काढण्यात आली आहे. आर्थिक संकटामुळे संतापलेल्या हजारो नागरिकांनी थेट राष्ट्रपती भवनावरच हल्लाबोल केला. आंदोलकांनी राजपक्षेच्या शासकीय घरावर तोडफोड केल्याचे वृत्त समोर येत आहे. कोलंबोमध्ये निदर्शनांदरम्यान आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये झटापट झाली आहे. पोलिसांसह अनेक जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर करण्यात आला.

आंदोलकांच्या या उद्रेकानंतर राष्ट्रपती राजपक्षे (President fleed) यांनी दुसऱ्या देशात पलवायन केल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रपतींनी पलायन केल्यानंतर परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न करीत असलेले पंतप्रधान रनील विक्रमसिंघे यांनीही राजीनामा (PM Resign) दिल्याचे वृत्त आहे. आंदोलकांनी संसद रजिता सोनारत्नेच्या घरावरही हल्ला केल्याची माहिती समोर आलीय.

दरम्यान, श्रीलंकेतील या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्व शाळा १५ जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चार विद्यापीठांना अस्थायी रुपात बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय