छत्रपती संभाजीनगर : शिक्षण हक्क कायदा (RTE) मध्ये केलेले जनहित विरोधी व विद्यार्थी विरोधी बदल रद्द करा आणि RTE अंतर्गत प्रवेश प्रक्रिया त्वरित सुरु करा, या मागणीसाठी आज स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया(SFI) ने छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्याचे शिक्षण सचिव यांना निवेदन पाठवले. Chhatrapati Sambhajinagar
निवेदन देताना SFI जिल्हा अध्यक्ष मनिषा बल्लाळ, जिल्हा सचिव ॲड.गणेश शिंदे, विद्यापीठ युनिट अध्यक्ष अरुण मते, वैभव पालवे, शरद निळे, अभिषेक शिल्पे आदींची उपस्थिती होती.
शिक्षण हक्क कायद्यात (RTE) केलेल्या जनहितविरोधी बदल रद्द करण्यात यावा यासाठी SFI-DYFI च्या वतीने राज्यभरातील विविध जिल्ह्यातून शिक्षण सचिवांना अर्थात महारष्ट्र शासनाला निवेदन पाठवण्यात येत आहेत. महाराष्ट्र शासनाने या निवेदनाची गांभीर्यपूर्वक दखल घेऊन RTE मधे केलेले जनहितविरोधी बदल रद्द केले गेले नाही तर SFI-DYFI च्या वतीने लवकरच या विरोधात पूर्ण राज्यभर जनआंदोलन उभे केले जाणार असल्याचे एसएफआय ने म्हटले आहे.