Saturday, May 4, 2024
Homeजुन्नरJunnar : समर्थ गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचे कराटे स्पर्धेत यश 

Junnar : समर्थ गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचे कराटे स्पर्धेत यश 

जुन्नर / सतीश शिंदे : समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ गुरुकुल, बेल्हे या सीबीएससी मान्यताप्राप्त इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य आंतर शालेय कराटे चॅम्पियनशिप २०२४ स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याची माहिती प्राचार्य सतीश कुऱ्हे व क्रीडा संचालक एच. पी. नरसुडे यांनी दिली. Junnar

जुन्नर येथे महाराष्ट्र राज्य आंतर शालेय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धा २०२४ नुकत्याच आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेमध्ये समर्थ गुरुकुल च्या आठ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.ज्ञत्यामध्ये गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी एक सुवर्णपदक,दोन रौप्यपदक व तीन कांस्यपदक मिळविले.

श्रेयश म्हस्के यास सुवर्णपदक, संस्कार भांबेरे व प्रणव गाजरे यांना रौप्य पदक तर उत्कर्ष बेलकर, सर्वेश वाघ आणि सोहम शेलार यांना कांस्यपदक मिळाले. तसेच रुद्र आहेर व गौरी चौधरी यांना सहभागाबाबतचे प्रमाणपत्र मिळाले.

या विद्यार्थ्यांना कराटे प्रशिक्षक महेंद्र गुळवे यांनी मार्गदर्शन केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके, सारिका शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत, प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर, सर्व विभागाचे प्राचार्य व विभाग प्रमुख व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

आरटीई कायद्यातील बदलाच्या आदेशाची प्रत जाळून पालकांनी केला निषेध!

बापरे! कोरोना नंतर चीनमधून “ही “नवीन समस्या जगात विध्वंस पसरवणार

भरघोस उत्पादन देणारी अशी करा उन्हाळी भुईमूग लागवड

ब्रेकिंग: शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर!

कॉम्रेड राजन क्षीरसागर यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल

DME : वैद्यकीय शिक्षण संचालनालय अंतर्गत 233 जागांसाठी भरती

Oriental insurance : ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी अंतर्गत 100 पदांची भरती

SEBI अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती

Pune : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 150 जागांसाठी नवीन भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय