Monday, May 20, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडरॅपीडोवर गुन्हा दाखल; रिक्षा संघटनांच्या आंदोलनाचे यश – बाबा कांबळे 

रॅपीडोवर गुन्हा दाखल; रिक्षा संघटनांच्या आंदोलनाचे यश – बाबा कांबळे 

लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत बैठक घेऊ – नाना भानगिरे

हडपसर येथे रिक्षा चालक-मालकांचे शाखेचे संघटनांच्या शाखेचे उद्घाटन

पुणे / क्रांतिकुमार कडुलकर : बेकायदेशीर दुचाकी टॅक्सी व्यवसाय करणाऱ्या रॅपीडो कंपनीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र रिक्षा पंचायत, ऑटो रिक्षा, टॅक्सी, बस ट्रान्सपोर्ट फेडरेशनच्या माध्यमातून दिलेल्या लढ्याचे हे यश आहे. बेकायदेशीर बाईक टॅक्सी कंपनीने शासनाचा कर बुडवला आहे. त्यामुळे त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी 19 डिसेंबर रोजी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे करण्यात आली होती. त्याची दखल घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असे महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी सांगितले.

जय महाराष्ट्र रिक्षा संघटना वतीने हडपसर येथील काळे बोराटेनगर रेल्वे गेट येथे रिक्षा चालक-मालकांच्या शाखेचा उद्घाटन समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी बाबा कांबळे बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या लढ्याला यश आले आहे. या पुढे मोबाईल अप्लिकेशन मधून हे ऍप रद्द करावे यासाठी पाठपुरावा करणार आहे. शांततेच्या लोकशाहीच्या मार्गाने देखील आंदोलन यशस्वी होऊ शकतो हे आम्ही सिद्ध करून दाखवले आहे. काही बोगस संघटनामुळे रिक्षा चालकांवर गुन्हे दाखल होऊन जेलला जावे लागले आहे, अशा बोगस प्रवृत्ती पासून दूर राहावे असे बाबा कांबळे यांनी आवाहन केले.

या वेळी बाळासाहेबांची शिवसेना पुणे शहर प्रमुख नानासाहेब भानगिरे म्हणाले की, आम्ही रिक्षा चालक मालकांच्या बाजूने असून पुणे शहरातील रिक्षा चालक – मालकांचे प्रश्न सोडण्यासाठी बाळासाहेबांचे शिवसेना हा पक्ष प्रयत्न करत आहे. आम्ही लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन रिक्षाचालक – मालक यांच्या मागण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहोत.

महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे, संतोष राजपूत, कपिल काळे, मारुती आबा तुपे, पुणे शहराध्यक्ष मोहम्मद शेख, कार्याध्यक्ष विलास खेमसे पाटील आदी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन जय महाराष्ट्र रिक्षा संघटनेचे अध्यक्ष गुलाब सय्यद, आप्पा हिरेमठ, बाळासाहेब विटकर, अंकुश ओव्हाळ, चंद्रकांत शिवरकर, बालाजी वजरे, राजमल कुमावत यांनी कार्यक्रमाच्या संयोजनासाठी परिश्रम घेतले.

LIC life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय