Friday, May 10, 2024
HomeNewsसंरक्षण उद्योगाचे खाजगीकरण राष्ट्रीय हितासाठी धोकादायक आहे-कॉम्रेड सलीम सय्यद

संरक्षण उद्योगाचे खाजगीकरण राष्ट्रीय हितासाठी धोकादायक आहे-कॉम्रेड सलीम सय्यद

सातारा येथील कामगार प्रशिक्षण शिबिरात प्रतिपादन

सातारा/क्रांतिकुमार कडुलकर:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारी बँका,एअर इंडिया,विमानतळ,रेल्वे,सरकारी नवरत्न उद्योगासहीत सर्व क्षेत्रात खाजगीकरण सुरू केले आहे.सरकारने आता भारत सरकारच्या संरक्षण उद्योगातील दारुगोळा,रणगाडे,तोफखाना,बंदुका सह विविध उत्पादन,देखभाल,दुरुस्ती,गुणवत्ता इ विभागातील सर्व कारखान्यांमध्ये खाजगीकरण सुरू केले आहे.संरक्षण समुग्रीचे अब्जावधी मूल्याचे कारखाने सरकारने हळूहळू खाजगी मालकीचे होतील,त्यामुळे संपूर्ण संरक्षण उद्योगातील व्यापक राष्ट्रीय हितावर गंभीर परिणाम होतील.असा इशारा एम.टी.एस.एस.डी.युनियन,खडकीचे अध्यक्ष कॉम्रेड सलीम सय्यद यांनी ‘कामगार प्रशिक्षण’ शिबिरात दिला.ते पुढे म्हणाले की,बांगलादेश युद्धाच्या वेळेस कॅलटेक्स या खाजगी कंपनीने भारताला डिझेल पुरवठा बंद केला होता.खाजगी कंपन्या स्वतःच्या नफ्यासाठी राष्ट्रीय हिताला प्राधान्य देणार नाहीत.सर्व सरकारी क्षेत्रासह संरक्षण उद्योगात 100 टक्के खाजगी गुंतवणूकीच्या धोरणाचा सरकारने फेरविचार करावा.खाजगी कंपन्या कंत्राटी पद्धतीने कारखाने चालवतील.चीन,पाकिस्तान बरोबर झालेल्या युद्धात संरक्षण उत्पादनातील कामगारांनी अहोरात्र कामे करून सैन्यदलाच्या युद्धकालीन गरजा पूर्ण केल्या आहेत. भारतात शस्त्रास्त्रे निर्यातीमध्ये हितसंबंध असणारे उद्योग निर्माण झाले तर ऐन युद्धाच्या वेळेस हे उद्योग भारताचे आणि अन्य राष्ट्रे यांच्या हितसंबंधांमध्ये भारताचीच निवड करतील याची खात्री कोण देऊ शकते?आता सर्व कामगारांनी खाजगिकरणाच्या विरोधात मोठा लढा उभारण्याची तयारी करावी असे आवाहन कॉम्रेड सलीम सय्यद यांनी विचारला आहे.

—–सेंट्रल ए.एफ.व्ही. डेपो खडकी येथील कामगारांच्या भविष्यासाठी अविरतपणे काम करणारी एम.टी.एस.एस.डी. वर्कर्स युनियन या संघटनेने संघटनेतील कार्यकर्त्यांसाठी सातारा येथील वासोटा या अभयारण्यात ‘कामगार प्रशिक्षण शिबिर’ दिनांक 24 डिसेंबर व 25 डिसेंबर 2022 रोजी आयोजित केले होते.यामध्ये जवळपास 200 कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.वासोटा हे एक ऐतिहासिक ठिकाण असून छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते आत्तापर्यंत हे ठिकाण अतिशय प्रसिद्ध आहे कोयना धरणाच्या बॅक वॉटर मध्ये निसर्गाच्या वातावरणाचा लाभ सर्व कार्यकर्त्यांना घेण्यात आला व संघटनेच्या भविष्यातील घडामोडी व वाटचाली संदर्भात महत्वपूर्ण चर्चा करण्यात आली.

एम.टी.एस एस.डी वर्कर्स युनियन ही सेंट्रल ए एफ व्ही डेपो खडकी येथील ऑल इंडिया डिफेन्स फेडरेशन या राष्ट्रीय युनियनशी संलग्न आहे,स्वातंत्र्यपूर्व काळात या युनियनची स्थापना झालेली आहे,युनियनचे अमृतमहोत्सवी वर्ष सुरू आहे,देशपातळीवर सर्वात मोठी संरक्षण उत्पादन कारखान्यातील युनियन आहे.यावेळी युनियनचे उपाध्यक्ष आर पी घुले,सरचिटणीस विशाल डुंबरे, खजिनदार किरण ननावरे व इतर पदाधिकारी शिबिरास उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय