पिंपरी चिंचवड : १० वी, १२वी नंतर नेमके काय करावे? हा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना सतावत असतो. तुमचे गुण आणि क्षमतेचा विचार न करता अनेक जण सल्ले देतात. एका पारंपरिक चौकटीच्या विचारामुळे पालक, विद्यार्थी गोंधळलेले असतात. जागतिकीकरण आणि मुक्त अर्थव्यवस्थेला औद्योगिक, माहिती तंत्रज्ञान, वाणिज्य, संगणक, बँकिंग, प्रगतिशील कृषी, दुग्ध, वनौषधी, पशु पक्षी पालन, मत्स्य व्यवसाय, डिजिटल बँकिंग, पर्यटन, या नव्या क्षेत्रात कुशल पदवीधर मिळत नाहीत. पारंपरिक विद्यापीठीय शिक्षणाला मर्यादा आहेत. त्यामुळे योग्य समुपदेशन (CAUNCILLING), विद्यार्थ्यांचा कल (IQ TEST) पाहून 10 वी, 12 वी नंतरच्या शिक्षणाच्या वाटा शोधाव्यात, असे बाबुराव घोलप महाविद्यालय, सांगवी येथील वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.डॉ.वंदना पिंपळे यांनी सांगितले आहे.
वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना नीट (NEET) प्रवेश परीक्षा देणे अनिवार्य आहे. ‘नीट’ परीक्षेत संपादन केलेल्या गुणांच्या आधारे वैद्यक अभ्यासक्रमातील प्रवेश निश्चित केले जातात. ही परीक्षा सर्वच राज्यामध्ये घेतली जाते. पशु वैद्यकीय (veterniry) शिक्षण म्हणजे गुरांचा डॉक्टर असे हिणवले जाते. अशा शिक्षणाला खूप प्रतिष्ठा विकसित देशात आहे, आपण त्या क्षेत्राकडे का दुर्लक्ष करत आहोत? काळानुसार बदलले पाहिजे, शिकाल तर टीकाल असे बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले आहे. इंग्रजी हे वाघिणीचे दूध आहे, महात्मा ज्योतिबा फुले म्हणाले, त्यामुळे बदल करून घेतला पाहिजे.
संगणक’ बदलत्या जीवनशैलीची गरज आहे. मोबाईल जेवढी काळाची गरज आहे तेवढाच संगणकही, प्रचंड मोठ्या प्रमाणात संगणकात बदल घडून आले आणि संगणकाशी संबंधित आणि त्यावर अवलंबून असलेले क्षेत्र जलद गतीने विकसीत होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अँड्रॉइड मोबाईल हा मोठा मार्गदर्शक आहे. त्यासाठी मोबाईल वर अधिकृत महाविद्यालये, शिक्षण संस्था, विविध कोर्सेसची माहिती सहज उपलब्ध आहे.
मोबाईल वर बिनकामाचे गेम, चॅटिंग, नकारात्मक माहितीपासून विद्यार्थ्यांनी दूर राहुन सकारात्मक माहितीचे संकलन विद्यार्थानी करावे, संगणकाद्वारे स्वतःचे ज्ञान वृद्धिंगत करावे असे सांगून प्रा.वंदना पिंपळे पुढे म्हणाल्या की, प्राविण्य मिळालेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या महाविद्यालयातील शिक्षका मार्फत काय करावे, याचे मार्गदर्शन घ्यावे, कुणीतरी सांगत आहे, आणि मनाविरुद्ध कोणताही प्रवेश घेऊ नये.
अग्निशमन, इंटीरियर डिझाईन, वास्तुविशारद, इंडस्ट्रीज, फॅक्टरी, मास कम्युनिकेशन, कम्युनिकेशन डिझाईन, वेब डिझाईन, फॅशन डिझाईन, ॲनीमेशन अनिमेशन, आदरातिथ्य करियर एक नवीन क्षेत्र आहे, सेवा उद्योग क्षेत्रात आदरातिथ्य क्षेत्र नव्याने विकसीत होत आहे.
आपत्ती व्यवस्थापन, जन आरोग्य, पर्यावरण, आहारतज्ञ, ऍग्रीक्लिनिक व ऍग्रीबिझनेस या नव्या वाटा आहेत.
केंद्र सरकारच्या कृषी विभागांतर्गत ‘मॅनेज’ हैदराबाद या संस्थेच्या माध्यमातून ऍग्रीक्लिनिक ऍण्ड ऍग्रीबिझनेस हा कोर्स सन 2002 – 2003 पासून सुरू झाला. महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठातील शिक्षणाच्या संधी आवर्जून लक्षात घेतल्या पाहिजेत. विद्यार्थ्यांनी चौकटीच्या बाहेर (OUT OF THINKING) जाऊन मन आणि बुद्धीला पटणारे अभ्यासक्रम निवडावेत. ज्ञान तुमच्या दारात आहे, त्याचे घरात स्वागत करा, असेही पिंपळे म्हणाल्या.