Sunday, May 19, 2024
Homeबॉलिवूडअभिनेता अर्शद वारसी : माझ्या पेंटिंग खरेदी करा; वीजेचे बिल भरायचेय, किडणीही...

अभिनेता अर्शद वारसी : माझ्या पेंटिंग खरेदी करा; वीजेचे बिल भरायचेय, किडणीही विकण्याची तयारी.

(मुंबई) :- राज्यात कोरोनाने हाहाकार माजवला आहे, परिणामी लॉकडाऊनमुळे रोजगार नाही अशात लोकांना भरमसाठ वीज बिले आल्याची तक्रार राज्यभरातून होत आहे. यातून सेलिब्रिटीही सुटलेले नाहीत. अशातच अभिनेता अर्शद वारसी ट्विट केले आहे कि, माझ्या पेंटिंग खरेदी करा मला वीजेचे बिल भरायचे आहे.

      अर्शदला तब्बल 1 लाख 3 हजार 564 रूपयांचे बिल आले आहे. याबद्दलचा संताप त्याने सोशल मीडियावर व्यक्त केला होता.  ‘मला वीज बिल भरण्यासाठी पैशांची गरज असल्याने माझी पेंटिग्स खरेदी करा,’ असे त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. इतकेच नाही तर माझ्या किडण्या मी पुढील बिलासाठी राखून ठेवत असल्याचेही त्याने या ट्विटमध्ये लिहिले आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय