Shikhar Dhawan : भारतीय क्रिकेट संघासाठी गेल्या अनेक वर्षांपासून मैदानावर धावांचा पाऊस पाडणारा दिग्गज फलंदाज शिखर धवनने (Shikhar Dhawan) आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. धवनने आपल्या सोशल मीडिया खात्यांवर एक व्हिडिओ पोस्ट करून हा निर्णय जाहीर केला आहे.
शिखर धवनने साधारण 1 मिनिट 17 सेकंदांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये धवनने आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील विविध लोकांचे आभार मानले आहेत, ज्यामध्ये त्याचे प्रशिक्षक, सहकारी खेळाडू, बीसीसीआय आणि आयसीसी यांचा समावेश आहे.
शिखर धवनने (Shikhar Dhawan) आतापर्यंत 34 कसोटी, 167 एकदिवसीय आणि 68 टी-20 सामने खेळले आहेत. धवनने 2022 पासून भारतीय क्रिकेट संघातून बाहेर होता. आपल्या आक्रमक आणि धडाकेबाज फलंदाजीसाठी ओळखला जाणारा धवन भारतीय संघातील एक महत्त्वाचा खेळाडू होता.
Shikhar Dhawan
शिखर धवनने इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये देखील उत्कृष्ट कामगिरी केली आहे. पंजाब किंग्ज संघाचा कर्णधार म्हणून त्याने टीमला अनेकदा विजय मिळवून दिला आहे. आयपीएलमध्ये धवनने 6,769 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याने 51 अर्धशतकं आणि 2 शतकं झळकावली आहेत.
हेही वाचा :
मोठी बातमी : महाराष्ट्र बंदला न्यायालयाकडून ब्रेक, महाविकास आघाडी निषेध नोंदवणार
शरद पवार यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा, पवारांनी व्यक्त केली शंका
Accident : नेपाळ बस अपघात, ४० भारतीय प्रवाशांना जलसमाधी, १४ ठार
धक्कादायक : बदलापुरनंतर कोल्हापूरमध्ये दहा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून खून
Thane : ठाणे येथे प्राध्यापक पदाच्या 34 जागांसाठी भरती
indian Bank : इंडियन बँक अंतर्गत 300 पदासाठी मोठी भरती
MPSC : एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय; विद्यार्थ्यांच्या आंदोलनास यश
मोठी बातमी : दहावी-बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार
सोयाबीनवरील विषाणुजन्य रोगाचा प्रसार करणाऱ्या किडींचे व्यवस्थापन
श्री विलेपार्ले केळवणी मंडळ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, धुळे अंतर्गत भरती