Wednesday, February 19, 2025

ब्रेकिंग न्यूज : जुन्नर तालुक्यात ओमीक्राॅनचे आढळले सात रुग्ण

पुणे : जुन्नर तालुक्यात ओमीक्राॅन या आजाराचा शिरकाव झाला असून तालुक्यात सात रुग्ण आढळले, त्यामध्ये वारुळवाडी येथे पाच तर नारायणगाव येथील दोन रुग्ण आहेत.

याबाबत माहिती अशी की येथील सोळाजण दुबई या ठिकाणी पर्यटनासाठी गेले होते, ते तेथून परत आल्यानंतर त्यांची आर पी टी सी आर चाचणी करण्यात आली व त्याचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले. त्यापैकी सातजणांचे रिपोर्ट ओमीक्राॅन पाॅझिटिव्ह आले असून त्यांच्यावर नारायणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहे. या सर्वांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची पी सी आर टी सी आर चाचणी नारायणगाव येथे घेण्यात आली असल्याचे वैद्यकिय अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ यांनी दिली आहे.


Related Articles

- Advertisement -

Latest Articles