Friday, May 10, 2024
Homeजुन्नरजुन्नर : ॲड. तुषार पाचपुते यांचा गुणगौरव पुरस्काराने सन्मान

जुन्नर : ॲड. तुषार पाचपुते यांचा गुणगौरव पुरस्काराने सन्मान

वडगाव कांदळी : वडगाव कांदळी येथील ॲड तुषार पाचपुते यांनी सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल पुण्याच्या  सुखकर्ता सांस्कृतिक प्रतिष्ठान पुणे यांच्यावतीने गुणगौरव पुरस्कार २०२१ ” हा मानाचा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

वडगाव (कांदळी) गावचे सुपुत्र व पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचे नामवंत वकील अँड.श्री.तुषार पाचपुते यांनी तुषारदादा युवा मंचच्या माध्यमातून विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबविले आहे. तसेच सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी अनेकांच्या कलागुणांना वाव देण्याचे काम करण्यात आले आहे. कोरोना काळातही युवा मंचच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविले आहेत. त्यांनी अनेक गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत देऊन त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहीत केले आहे. 

त्यांनी केलेल्या या कार्याची दखल घेऊन पुण्याच्या सुखहर्ता प्रतिष्ठानच्यावतीने उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते  त्यांना गुणगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ॲड तुषार पाचपुते यांचे सामाजिक कार्य त्यांच्या युवा मंच च्या माध्यमातून दिवसेंदिवस विस्तारत जाऊन गोरगरीबांची सेवा घडून एक आदर्श समाज घडविण्याकामी त्यांचे  कार्य नक्कीच फायदेशीर ठरेल असे गौरव उद्गार काढून मान्यवरांनी कौतूकाची थाप देखील दिली. 

या कार्यक्रम प्रसंगी सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्रपुष्पा चौधरी, जेष्ठ विनोदी कथालेखक श्याम भुर्के, जेष्ठ लेखिका माया प्रभूणे शेखर कोरडे, अनूप कोल्हापुरे,

दत्तात्रय उभे,प्रविण खत्री, तान्हाजी शिरोळे, भानूदास पायगुडे, किशोर धोमकर, माधुरी ठोंबरे, गौरी पाठक, उज्वला बडदरे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय