हायेफा : अखेर इराणने इस्रायलवर 150 हून जास्त क्षेपणास्त्र डागून मोठा हल्ला केल्याचे वृत्त प्रसारित झाले आहे. या हल्ल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. इराणची क्षेपणास्त्रं एकापाठोपाठ एक इस्रायलच्या तेल अवीव सह काही शहरात आदळली आहेत. (Breaking)
इराण समर्थक हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेचा प्रमुख नसरल्लाहची इस्रायलनं हत्या केली होती. या हत्येचा बदला घेण्यासाठी हा हल्ला केल्याचं इराणनं जाहीर केलं आहे.
याबाबत इस्राएल डिफेन्स फोर्सने (IDF) या हल्ल्याची पुष्टी केली आहे. इस्रायलच्या नागरिकांना बॉम्ब शेल्टर मध्ये आश्रय घेण्याचे आदेश इस्रायलने दिले असून इराण आणि इस्रायल मधील प्रत्यक्ष संघर्षाला सुरवात झाली असल्याची भीती आता व्यक्त करण्यात आली आहे.
इस्रायलवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केल्यानंतर इराणने एक निवेदन प्रसिद्ध करून हेजबुल्ला प्रमुख हसन नसराल्लाह आणि हमासचे राजकीय नेते इस्माईल हनिया यांच्या मृत्यूचा बदला असल्याचे म्हटले आहे.
इराणने असा इशाराही दिला आहे की जर इस्रायलने प्रत्युत्तर दिले तर तेहरानची प्रतिक्रिया अधिक विनाशकारी असेल. ” असं इराणी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे. (Breaking)