Tuesday, October 8, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : अ‍ॅड. चारुशिला जाधव-टाले यांची समाज विकास विभागात वकील म्हणून नेमणूक

PCMC : अ‍ॅड. चारुशिला जाधव-टाले यांची समाज विकास विभागात वकील म्हणून नेमणूक

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : चिंचवड येथील अ‍ॅड. चारुशिला जाधव-टाले गेली 20 वर्षे वकीली व्यवसाय संभाळून विविध शाळांमधील वयात आलेल्या मुलींना कार्यशाळेद्वारे समुपदेशन व मार्गदर्शन करीत आहेत. (PCMC)

कोर्टात पक्षकारांना जाण्याआधीच आपापसात समझोता करता येईल का? याबाबत सातत्याने मार्गदर्शन करतात.

पुणे महानगरपालिका समाज विकास विभाग महिला आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार 15 क्षेत्रीय कार्यालयांचे ठिकाण स्त्री संसाधन केंद्र (सक्षमा कक्ष) सुरु आहेत. (PCMC)

स्त्री संसाधन केंद्रामार्फत महिला सक्षमीकरणासाठी, महिलांना कौटुंबिक वादाबाबत समुपदेशन आणि मार्गदर्शन केले जाते. स्त्री संसाधन केंद्रात समुदेशकांमार्फत न सुटलेल्या प्रश्नांबाबत कौटुंबिक न्यायालयात केसेस पाठविल्या जातात.

त्यासाठी उपआयुक्त नितीन उदास यांनी स्त्री संसाधन केंद्रातील (सक्षमा कक्ष) कौटुंबिक न्याय आणि न्यायालयीन केसेस पाहण्याकरिता पॅनेल अ‍ॅडव्होकेट म्हणून 15 क्षेत्रीय कार्यालयांत वकिलांची नेमणूक केली आहे. शिवाजीनगर, घोले रोड क्षेत्रीय कार्यालय येथे निवड करण्यात आली.

संबंधित लेख

लोकप्रिय