Saturday, April 27, 2024
HomeNewsब्रेकिंग : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा अपघातात मृत्यू !

ब्रेकिंग : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा अपघातात मृत्यू !

मुंबई : उद्योग क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर येत आहे. टाटा समूहाचे माजी अध्यक्ष आणि उद्योगपदी सायरस मिस्त्री यांचा अपघातात मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे.

सायरस मिस्त्री हे दुपारी सव्वातीन वाजल्याच्या सुमारास अहमदाबातवरुन ते मुंबईला येत होते. त्यावेळी डिव्हायडला गाडी धडकल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती पालघर पोलीस अधिक्षकांनी दिली आहे. मिस्त्री हे मर्सिडीज गाडीने प्रवास करत होते. हा अपघात झाल्यानंतर तात्काळ दोघांचा मृत्यू झाला तर इतर दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या संदर्भात अधिकचा तपास पोलीस करत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

कोण आहेत सायरस मिस्त्री?

सायरस मिस्त्री हे उद्योग क्षेत्रातील मोठे नाव आहे. उद्योगपती पल्लोनजी मिस्त्री यांचे ते सुपूत्र होते. त्यांचे शिक्षण लंडन बिझनेस स्कूलमध्ये झाले. मिस्त्री हे 2006 साली टाटा समूहाचे सदस्य बनले. वयाच्या 43 व्या वर्षी 2013 साली ते टाटा समुहाचे अध्यक्ष बनले. 2016 साली झालेल्या वादानंतर मिस्त्रींना अध्यक्षपदावरुन हटवण्यात आलं. सायसर मिस्त्री हे शापूरजी पल्लोनजी समुहाचे मॅनेजिंग डायरेक्टर होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय