Friday, March 29, 2024
HomeNewsपेटीएम, कॅशफ्री, रेझरपे कंपन्यांवर 'ईडी'ची छापेमारी, सायबर पोलिसांकडे १८ एफआयआर दाखल

पेटीएम, कॅशफ्री, रेझरपे कंपन्यांवर ‘ईडी’ची छापेमारी, सायबर पोलिसांकडे १८ एफआयआर दाखल

नवी दिल्ली : आर्थिक अफरातफर प्रकरणात सक्रिय झालेल्या ईडी (ED)ने शनिवारी डिजिटल पेमेंट कंपन्यांवर लागोपाठ छापे (Raid) टाकले. पेटीएम, कॅशफ्री, रेझरपे या कंपन्यांच्या बंगळुरू येथील कार्यालयांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छापेमारी केली.

ईडीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, मोबाइल ॲपद्वारे कर्ज देणाऱ्या पेटीएम, कॅशफ्री, रेझरपे या कंपन्यांच्या तसेच कंपनीशी संबंधित अशा सहा ठिकाणी शुक्रवारी आणि शनिवारी ईडीने छापेमारी केली. या कंपन्यांकडून मोबाइल ॲपवरून लोकांना कर्ज देणे आणि त्याच्या वसुलीसाठी लोकांची पिळवणूक केल्याचा आरोप आहे. या कंपन्यांविरोधात सायबर पोलिसांकडे १८ एफआयआर दाखल आहेत.

या कंपन्यांनी कर्जाचा व्यवसाय करतानाही अनेक नियमांचे उल्लंघन केल्याचे ईडीच्या प्राथमिक तपासात पुढे आले आहे. या छापेमारीदरम्यान या कंपन्यांच्या खात्यांतील १७ कोटी रुपयांची रक्कमही जप्त करण्यात आली.

या कंपन्यांनी काही भारतीयांची ओळखपत्रे, तसेच संबंधित कागदपत्रांचा गैरवापर करत त्यांना कंपनीत संचालक असल्याचे दाखवल्याचाही आरोप आहे. मात्र, या कंपन्यांचे खरे मालक चिनी नागरिक असल्याचेही तपासात उघड झाले आहे.

संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय