Thursday, May 9, 2024
Homeराष्ट्रीयरेशन दुकानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो नसल्याने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन...

रेशन दुकानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो नसल्याने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन जिल्हाधिकाऱ्यावर संतापल्या !

बिरकूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो रेशन दुकानात नसल्यावरून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन चांगल्याच भडकल्याचे सांगितले जात आहे.निर्मला सीतारामन या तेलंगण दौऱ्यावर होत्या. भाजपाच्या ‘लोकसभा प्रवास योजने’च्या अंतर्गत सीतारमण यांनी कामारेड्डी जिल्ह्यातील बिरकुर येथे भेट दिली. यावेळी तेथील एका रेशन दुकानात जात नागरिकांशी चर्चा केली. तेव्हा सीतारमण यांना त्या रेशन दुकानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो नसल्याचे निदर्शनास आले. त्यावरुन त्या चांगल्याच संतापल्या आणि अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.

बाजारात एका किलो तांदळाची किंमत ३५ रुपये आहे. तो तुम्हाला १ रुपयांना दिला जातो. केंद्र सरकार ३० रूपये खर्च उचलते, तर राज्य सरकार फक्त ४ रूपये खर्च देते. करोना महामारी सुरू झाल्यापासून प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत पाच किलो तांदूळ मोफत दिला जात आहे. मात्र, तेलंगणातील सरकार रेशन दुकानांमध्ये पंतप्रधान मोदींचे फोटो लावत नाही. पंतप्रधानांचे बॅनर लावले जातात, तेव्हा ते फाडण्यात येतात. पंतप्रधानांचा फोटो रेशन दुकानात का नाही, असा सवाल करत अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय