आळंदी : माऊली मंदिरात प्रवेश करण्याच्या वादातून पोलीस व वारकरी यांच्यात सुरवातीला शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर काही वारकऱ्यांनी पोलीस बंदोबस्ताचे ब्यारीकॅड तोडून मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी पोलीस कर्मचारी व वारकरी यांच्यात झटापट झाली.
पालखी सोहळ्याच्या प्रस्थान सोहळ्याच्या वेळी प्रत्येक दिंडीतील केवळ ७५ वारकऱ्यांनाच आतमध्ये घेऊन जाण्याचं आवाहन आळंदी देवस्थानाकडून करण्यात आलं आहे. त्यामुळे मुख्य मंदिरात जाण्यासाठी शेकडो वारकरी जमले होते.
अखेर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करून गर्दीवर नियंत्रण मिळवले आहे. पालखी प्रस्थानाचे वेळी अशा प्रकारचा तणाव पोलीस लाठीचार्ज कधीच झाला नव्हता. सहसा वारकरी पोलीस यांच्यात विवाद होत नाहीत, मात्र या लाठीचार्जमूळे पालखी प्रस्थान सोहोळयाला गालबोट लागले आहे.
हे ही वाचा :
अमित शहांच्या भाषणातील २० मिनिटात ७ मिनिटे उद्धव ठाकरेंवर, मातोश्रीचा धसका कायम; राऊत यांची टीका
ब्रेकिंग : पुणे – सातारा महामार्गावर 4 वाहनांचा विचित्र अपघात, चौघांचा मृत्यू तर 23 प्रवासी जखमी
बॉलीवूडला धक्का : प्रसिध्द अभिनेत्याचे निधन
नव्या शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करा – राज्यपाल रमेश बैस
आषाढी वारीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज, अशा असणार सोयी-सुविधा
मुदतवाढ : पुणे पशुसंवर्धन विभाग अंतर्गत 446 पदांसाठी भरती
‘सौरभ पिंपळकर हा भाजपाचाच कार्यकर्ता’, चंद्रशेखर बावनकुळे यांची कबुली; पण ती धमकी नाही…