Sunday, May 19, 2024
Homeजिल्हाआडम मास्तर विचार मंच वतीने रक्तदान शिबीर व अन्नदान कार्यक्रम

आडम मास्तर विचार मंच वतीने रक्तदान शिबीर व अन्नदान कार्यक्रम

सोलापूर / दत्ता चव्हाण : आडम मास्तर विचार मंच च्या वतीने माजी आमदार कॉ. आडम मास्तर व माजी नगरसेवक कॉ. व्यंकटेश कोंगारी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. 

यामध्ये 1 जून रोजी आडम मास्तर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर आयोजित केले होते. यामध्ये 68 रक्त दात्यांनी रक्तदान केले. 2 जून रोजी व्यंकटेश कोंगारी यांच्या वाढदिवसानिमित्त बेघर निवारा केंद्र व शहरातील विविध ठिकाणी बेघराना अन्नदान करण्यात आले. 

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आडम मास्तर विचार मंचाचे संस्थापक अशोक बल्ला, सनी कोंडा, शिवा श्रीराम, रविंद्र गेंट्याल, श्रीनिवास कुणे, प्रवीण जिल्ला, नागेश कैंचगुंडी, नरेश जोरीगल, अशोक वासी, पांडू जोरीगल व विचार मंचाचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.

सोलापूर : ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे अधिवेशन संपन्न

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांसाठी भरती, असा करू शकता अर्ज !

पुणे महानगरपालिका अंतर्गत तब्बल 330 जागांसाठी भरती, 15 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय