Thursday, May 2, 2024
Homeराष्ट्रीयअमेरिकेच्या रिपोर्टने मोदी सरकार अडचणीत

अमेरिकेच्या रिपोर्टने मोदी सरकार अडचणीत

नवी दिल्ली : अमेरिकेने आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य आयोगाचा (USCIRF) अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात भारताबद्दल हा उल्लेख करण्यात आला असून भारतातील अल्पसंख्याकांच्या धार्मिक स्वातंत्र्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री एंटनी ब्लिंकन यांनी गुरुवारी आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्रता रिपोर्ट २०२१ प्रकाशित केला. या अहवालाचा आधार घेत ब्लिंकन यांनी म्हटले आहे कि, भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे आणि येथे अनेक धर्मांचे लोक एकत्र राहतात, मात्र, भारतात धार्मिक स्थळे आणि अल्पसंख्याकांवर हल्ले वाढत आहेत. यासोबतच पाकिस्तान, चीन आणि अफगाणिस्तानमध्ये अल्पसंख्याक आणि महिलांनाही लक्ष्य केले जात असल्याचे ब्लिंकन यांनी म्हटले आहे.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यानंतर प्रियांका गांधी यांनाही कोरोनाची लागण

या अहवालात म्हटले आहे कि, धार्मिक द्वेशातून हत्या, मारहाण आणि दहशत पसरवली जात आहे. गेल्या वर्षभरापासून हा प्रकार सुरू आहे. त्यात गोहत्या अथवा बीफ व्यापाराचे आरोप करत हिंदू इतर लोकांवर हल्ले केले जात असल्याचं म्हटले आहे. 

तसेच धर्मांतरण विरोधी कायद्याचा वापर करून अनेकांना अटक करण्यात आली आहे. CAA आणि NRC विरोधात प्रदर्शन आणि दिल्ली दंगलीचा उल्लेख करत या काळात अनेक नेत्यांनी अल्पसंख्याकांविरोधात धार्मिक विधान आणि सोशल मीडियात पोस्ट केल्याचं रिपोर्टमध्ये सांगितले आहे. या रिपोर्टमुळे केंद्रातील मोदी सरकार अडचणीत आले आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांसाठी भरती, असा करू शकता अर्ज !

पुणे महानगरपालिका अंतर्गत तब्बल 330 जागांसाठी भरती, 15 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती, 9 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय