Wednesday, May 22, 2024
Homeकृषीकिसान सभेच्या वतीने वडवणी तहसीलदारांना खरीप पीक विमा व शेतकर्‍यांच्या न्याय मागण्या...

किसान सभेच्या वतीने वडवणी तहसीलदारांना खरीप पीक विमा व शेतकर्‍यांच्या न्याय मागण्या संदर्भात निवेदन

वडवणी :- (प्रतिनिधी)

       खरीप २०१९ मध्ये तालुक्यातील सर्व शेतकर्‍यांनी अॅग्रीकॅलचर इंशोरन्स कंपनीकडे आपल्या पीकाचा विमा काढलेला आहे व आता कापूस या पिकाचा विमा कंपनी ने हेक्टरी ४०४१ रू व एकरी १६४४ रू. मंजूर केला आहे आणि आता शेतकर्‍यांच्या खात्यावर  विमा रक्कम जमा होत आहे पण हि रक्कम खूपच कमी (अल्प) आहे, कारण पिक विमा भरणा प्रीमियर हा एकरी ८६० रू आहे व हेक्टरी २०२१ रू आहे. म्हणजे जेवढा प्रीमियर भरला आहे त्याच्या एकपट सुद्धा पीक विमा रक्कम ही कंपनी ने दिलेली नाही. एकरी, प्रीमीयर (विमाभरणा रक्कम) + CSC +७/१२ +झेरॉक्स  =, ८६०+१००+३०+२० =१००० रू एक हजार रूपये हा एकरी कापसाचा विमा भरण आहे  आणि  मंजुर विमा रक्कम १६४४ रू. म्हणजे फक्त ६०० रू. शेतकर्‍यांला नुकसान भरपाई रक्कम कंपनी ने दिले आहेत व कंपनीने शेतकर्‍यांची फसवणूक केली आहे.

        खरीप हंगामातील कापूस, तुर व सोयाबीन पिकाच १००% नुसान झाल असल्याकारणाने शेतकर्‍यांनी पिक लागवडी साठी केलेला खर्च सुद्धा निघला नाही. या खरीप हंगामात तालुक्यातील व कवडगाव महसूल मंडळातील शेतकर्‍यांनी २२ ते२४ जून रोजी लागवड, लावणी केली.लागवड केल्यापासून ५० दिवस पाऊस न पडल्यामुळे पीक पाण्या अभावी करपून गेले व शेतकर्‍यांना दुबार पेरणी करावी लागली.असे तालुका कृषीअधिकारी यांनी दिलेल्या अहवालात म्हटलेले आहे.

         

           जे पिक पाऊस न पडता ही तक धरूण होती .सप्टेंबर व अॉक्टोबर महिन्यात पडलेल्या अवकाळी व परतीच्या पाऊसाने सगळी पीके उद्ध्वस्त झाली. पीक पाण्याखाली गेली  व नदीच्या काठावरील शेतात ४ ते ८  दिवसाऊन अधिककाळ पाणी राहिल्यामुळे पीक पिवळेपडुन जवळू मृत झाले.व या मृत (नुकसान)झालेल्या पिकाचे पंचनामे प्रशासनाने केले.  पिकाचे  नुकसान झाल अस पंचनाम्यात नमूद केलेले आहे.  म्हणजे राहिलेल  पीक सुद्धा शेतकर्‍यांच्या हातातून निघून गेल.त्यामुळे उत्पादन व उत्पन्न ००काहीच निघल नाही .म्हणून शेतकरी हवालदिल झालेला आहे.

   

        शेतकर्‍यांना आता तारण्यासाठी मदतीसाठी त्यांनी काढलेले पिकाचे विमे (विमा) हाचा अशेचा किरण होता म्हणून शेतकर्‍यांनी कंपनी व प्रशासन सांगेल त्या प्रमाणे कागदपत्र सरकारी जमा केले यामध्ये “पीकचे नुकसान” झाले आहे असा अर्ज कंपनीला देण्यात्यासाठी शेतकरी भर पाऊसात उभे ठाकले.नंतर “पीक नुकसान भरपाई “मिळावी चा अर्ज तालूका कृषी अधिकारी व कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिला .असे दोन अर्ज त्या सोबत ७/१२ आठ,  विमा भरलेली पावती, अधारकार्ड ,बँक पासबुक ची झेरॉक्स, पीक नुकसान झालेले अँगल कॅमेरे चे फोटो हे शेतकर्‍यांनी अर्जा सोबत जोडुन दिले .तालुका कृषी अधिकारी व कंपनी कर्मचारी, महसूल प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यात पिकाचे नुकसान झालेले आहे अस नमुद असताना . सुद्धा कंपनीने कपसाचा विमा ऐवढा कमी मंजुर केला. कंपनीने संवेदनशीलपने विचार करून शेतकर्‍यांना कापूस या पीकांचा विमा हेक्टरी ३०,००० रू मंजूर करावा. अन्यथा शेतकरी व किसन सभा कंपनी व प्रशासनाच्या विराधात संवैधानिक मार्गाने तीव्र आंदोलन करतील .असा इशारा किसान सभेच्या वतीने देण्यात आला आहे शेतकर्‍यांच्या अन्य काही  मागण्या यामध्ये खरपी २०१९ मधील  कापूस, तुर, पिकाचा विमा हेक्टरी ३०,००० रू देण्यात यावा, २०२० मधील खरीपाचा विमा भरणा सुरू करावा, शेतकर्‍यांना लागवडी साठी खते व बियाणे चा मुबलक व रास्त भावात  पुरवठा करावा,

कापूसची नोंद सुरू ठेवावी व CCI ने कपूस खरेदी करावा, टोमॅटो पिकांवर पडलेल्या रोगामुळे टॉमॅटो शेतकर्‍यांना शासनाने मदत करावी, नैसर्गिक आपत्तीमधे शेतकर्‍यांना खऱ्या अर्थाने संरक्षण मिळेल अशी पीक विमा योजना सुरू करा, शेतीचा विद्युत पुरवठा व्यवस्थित करावा, महात्मा फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजनेच्या ३ र्या, ४थ्या यादीच आधार प्रमाणी करण करण्यात यावा, शेतकर्‍यांना सौरकृषी पंपच लवकरात लवकर वाटप कराव व नवीन सौरकृषी पंपाना मान्यता द्यावी. नवीन सौरकृषी पंपासाठी अर्ज स्वीकारावेत जे नियमीत कर्ज भरणारे शेतकरी आहेत त्यांना प्रोत्साहनपर अनुदान द्यावे आदी मागण्या करण्यात आल्या, वडवणी तहसीलदार यांनी मागण्याच निवेदन स्वीकारल व सर्व मागण्यांवर सकात्माक चर्चा केली व लवकरात लवकर पुढील कार्यवाही करण्याच आश्वासन दिले. शासन व प्रशासन या न्याय मागण्या लवकरात लवकर सोडतील हिच माफक अपेक्षा किसान सभेने व्यक्त केली आहे यावेळी

किसान सभेचे नेते ओम पुरी, गणेश अंबुरे , अमोल बडे, प्रकाश अंबुरे, कॉ.लहु खारगे, कॉ.सत्यजीत मस्के आदी उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय