Tuesday, May 21, 2024
Homeराज्यनेटवर्कच्या अडथळे झुगारून तलाठी चक्क इमारतीच्या छतावर बसून शेतकऱ्यासाठी तत्पर

नेटवर्कच्या अडथळे झुगारून तलाठी चक्क इमारतीच्या छतावर बसून शेतकऱ्यासाठी तत्पर

नेटवर्कच्या अडथळे झुगारून 

तलाठी चक्क इमारतीच्या छतावर बसून शेतकऱ्यासाठी तत्पर

कर्तव्यदक्ष तलाठी भूषण पाटील यांचे सर्वत्र कौतुक

वडवणी :- (लहू खारगे)

         सध्या पावसामुळे ग्रामीण भागात शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त आहे, शासनाच्या पीक कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी कागद पत्राची पूर्तता करण्यासाठी शेतकऱ्याना तलाठी कार्यालय जावेत लागते मात्र काही दिवसांपासून सतत होणाऱ्या पावसामुळे लाईट व इंटरनेट नेटवर्क कमी असल्यामुळे अडचण निर्माण होत आहे, मात्र वडवणी तालुक्यातील साळींबा सज्जाचे तलाठी भुषण पाटील यांनी शकल लढवत चक्क नेटवर्क चांगले चलावे म्हणून चक्क साळींबा येथील आरोग्य उपकेंद्राच्या छतावर जाऊन काम करत शेतकऱ्यांना सातबारा, फेरफार नक्कल उपलब्ध करून दिली. त्याच्या या लढवय्या वृत्तीचे सर्वत्र कौतुक होत असून शेतकरी सुद्धा आता म्हणतायत “तलाठी असावा तर भुषण पाटील साहेबांसारखा”.

        तलाठी भुषण पाटील हे

जळगाव जिल्ह्यातील शेतकरी परिवारातील असून नेहमीच आपल्या चांगल्या कार्याने चर्चेत असतात

कोरणो महामारीच्या काळात सुद्धा

शेतकऱ्यांना पाटील यांनी योग्य ती सेवा दिली. शेतकऱ्यांच्या भावना ओळखून त्यांची शेतकऱ्याविषयी तळमळ अनेकदा पाहण्यास मिळत असल्याचे अनेक शेतकरी सांगतात. अश्या या कर्तव्यदक्ष तलाठी साहेबाना महाराष्ट्र जनभूमी टीमचा सलाम.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय