Sunday, May 19, 2024
Homeग्रामीणनिसर्ग चक्रीवादळाचा महावितरणला मोठा फटका, वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम युध्दस्तरावर सुरू.

निसर्ग चक्रीवादळाचा महावितरणला मोठा फटका, वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम युध्दस्तरावर सुरू.

प्रतिनिधी :- जोरदार वादळी वाऱ्यासह आलेल्या निसर्ग चक्री वादळाचा महावितरणला मोठा फटका बसला आहे. चक्रीवादळाच्या रौद्ररूपामुळे अनेक ठिकाणी वीज वाहिन्या व विजेचे खांब कोसळले असून वीजपुरवठा खंडित झाला आहे. चक्रीवादळाची तीव्रता कमी होताच महावितरणने वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम युध्दस्तरावर सुरू केले आहे . निसर्ग चक्रीवादळाचे रौद्ररूप बघता महावितरणचे किती नुकसान झाले असेल याचा अंदाज सध्याच घेता येणार नाही, असे महावितरणने म्हटले आहेे.

             निसर्ग चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी महावितरणने बऱ्याच ठिकाणी आपली यंत्रणा सज्ज ठेवली होती . खबरदारीचा उपाय म्हणून महावितरणने उरण जीटीपीएस -२२० किव्हो या उपकेंद्रासह कांडलगाव , पाबरा व थल या प्रत्येकी १०० कि.व्हो . उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या उरण , अलीबाग , मुरुड , तळा , मानगाव , मसाळा , श्रीवर्धन व गोरेगाव या तालुकाच्या ठिकाणी असलेल्या २२ कि.व्हो . उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद केला होता . या वीज बंदमुळे आठ तालुक्यातील सुमारे २ लाख ६८ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित झाला होता. ६ बाय ६ उंचीचे ३ खांब गोंडघर इनकमर वीजवाहिन्या तुटून खाडीत कोसळल्या. 

             गोरेगाव उपविभागअंतर्गत येणाऱ्या कांदलगाव उपकेंद्राच्या उच्चदाब वाहिन्या जोरदार वाऱ्यामुळे बंद करण्यात आल्या होत्या. चक्रीवादळामुळे अंबरले येथील एक रोहीत्र आणि ३ उच्चदाब खांब कोसळून पडले. वडाचा कोंड येथे एका रोहित्राचा खांब वाकला. लोणेरे येथील एक लघुदाब खांब कोसळून पडला. वाशी येथील 22 के . व्ही फीडर ट्रिप झाला होता. वाशी येथील सेक्टर १७ मध्ये लोटे मामा खानावळजवळील लघुदाब वाहिनीवर झाड पडले होते. नावाडा येथे देखील एक उच्चदाब खांब कोसळून पडला. करंजाडे , बौध्दवाडा रस्त्यालगतचे तसेच घोटगाव येथील खांबावर झाड पडल्याने खांब कोसळून पडलेत.

तुर्भे एम.आय.डी. सी . येथील २२/२२ के व्ही. सबस्टेशनची कंपाउंड भिंतीचे देखील मोठे नुकसान झाले आहे . कल्याण परिमंडलात निसर्ग चक्री वादळासह झालेल्या पावसाने विविध भागात वीजपुरवठा बाधित झाला उन्हाळ्यातील वाढत्या तापमानामुळे वीजवाहक यंत्रणेवर बसविण्यात आलेल्या पिन इन्सुलेटर आणि डिस्क इन्सुलेटरवर पहिल्याच पावसाचे पाणी पडल्याने ते पंक्चर होऊन वीजपुरवठा बाधित झाला . याशिवाय झाडाच्या फांद्या वीजवाहक तारांवर पडल्याने व वाऱ्यामुळे वीजवाहक तारा तुटल्याने वीजपुरवठा बाधित झाला. कल्याण पश्चिममधील बारावे, रामबाग, शिवाजी चौक, रहेजा, कल्याण पूर्वमधील वालधुनी, ठाकुली, काटे मानिवली, चिंचपाडा, डोंबिवलीतील कोपर रोड, नांदीवली, आजदे, नवपाडा भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. कल्याण मंडल दोन अंतर्गत येणाऱ्या बदलापूर, उल्हासनगर, शहापूर, मुरबाड, अंबरनाथ याठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. वसई मंडल वाड्यातील काही भाग व अर्नाळा परिसरात वीजपुरवठा बाधित झाला होता. 

             मंगळवारी रात्रीपासून वादळी वाऱ्यासह सुरू असलेल्या पावसात फॉल्ट शोधून तो दुरुस्त करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी व कंत्राटदाराचे कामगार अहोरात्र काम करीत आहेत. 


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय