Sunday, May 19, 2024
Homeराज्यअंतिम वर्षाच्या परिक्षांबाबत त्वरीत निर्णय घ्या; एसएफआय'चे राज्यपालांना निवेदन

अंतिम वर्षाच्या परिक्षांबाबत त्वरीत निर्णय घ्या; एसएफआय’चे राज्यपालांना निवेदन

प्रतिनिधी :- देशात कोरोनाचे संकट निर्माण झाले आहे. येऊ घातलेले चक्रीवादळाचे संकट अशा भयान परिस्थितीत राज्याचे मुख्यमंत्री एक निर्णय जाहीर करतात आणि राज्यपाल दुसरा निर्णय हे विद्यार्थी हिताच्या दृष्टीने योग्य नसल्याचे म्हणत स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया कोल्हापूर जिल्हा कमिटीने अंतिम वर्षाच्या परिक्षांबाबत त्वरीत योग्य निर्णय घेण्याबाबतचे निवेदन पाठवले आहे.

          कोरोनाच्या संकटात विद्यार्थी परिक्षांबाबत संभ्रमात आहे. त्यात सातत्याने बदलणारी भूमिकेने विद्यार्थी चिंतेत आहे. संभ्रमावस्थेत असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे मानसिक स्वास्थ्यासाठी राखण्यासाठी परिक्षा घ्या अगर घेऊ नका. परंतु योग्य तो निर्णय त्वरित घ्या, असे पत्रात म्हटले आहे.

          पत्रात राज्य सचिवमंडळ सदस्य नवनाथ मोरे, जिल्हा अध्यक्ष सर्वेश सवाखंडे, जिल्हा सचिव, रत्नदिप सरोदे, जिल्हा सहसचिव प्रेरणा कवठेकर, तुषार सोनुले यांची नावे आहेत.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय