Monday, May 20, 2024
Homeग्रामीणरहस्य वटपौर्णिमेचे - काय आहे जाणून घ्या

रहस्य वटपौर्णिमेचे – काय आहे जाणून घ्या


         ( वटपौर्णिमा का करता हे अनेक जणांना माहिती नसते.  वटपौर्णिमा
 साजरी करण्यामागील उद्देश खरा काय आहे? त्यातून काय साध्य होणार आणि निसर्गाच्या दृष्टीने काय महत्त्वाचे याचा आढावा घेणारा आणि विश्लेषण कराणारा लेख. )


          [सदर लेख Rationalist या ब्लॉगवर पूर्वी प्रकाशित झाला असून ब्लॉगरच्या परवानगीने आम्ही पुनर्प्रकाशित करत आहोत. लिंक: https://rationalist1505.wordpress.com/]

           जागतिक पर्यावरण दिन आणि वटपौर्णिमा एकाच दिवशी होते. १९७२ साली संयुक्त राष्ट्र संघ आयोजित मानवी पर्यावरण विषयी स्टॉकहोम परिषदेच्या पहिल्या दिवशी केली. हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस “वटपौर्णिमा” म्हणून साजरा केला जातो. ह्या दिवशी स्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात. या व्रतानुसार विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. पौराणिक कथेनुसार सावित्री यमराजाकडून आपले पतीचे प्राण परत आणते. हे जर सत्य असते, कोरोनाच्या संकटात असंख्य पुरूषांना आपले प्राण गमवावे लागले. त्या महिलांनी पण हेच व्रत केले असते तर, डॉक्टरांची गरज भासली नसती, शासनाचा खर्च वाचला असता. पुरूषाला मृत्यूला सामोरे जावे लागले नसते. यातून हे म्हणायचे आहे, की पुरुषाच्या दीर्घ आयुष्यासाठी स्रियांनी व्रत केले पाहिजे. परंतु स्रियांसाठी पुरूषांनी व्रत केल्याचे कधी पाहिले आहे का?  फक्त कोरोनामुळे घरात राहून वटपौर्णिमा साजरी करण्यासाठी वडाच्या फांद्या घरी आणून पुजण्याला खूप जास्त प्राधान्य दिले जात आहे, त्यामुळे वडाच्या फांद्यांची विक्री वाढली आहे.

             हे लिहावेसे का वाटले, कारण सर्वेश या मित्राचा फोन आला. अरे मी बाजारात वडाच्या फांद्या विक्रीसाठी पाहिल्या. म्हणजे वटसावित्रीचे व्रत करण्यासाठी श्रध्देच्या नावाखाली हजारो वृक्षांची तोड केली जात आहे. कोरोनासारख्या संकटाच्या काळात मंदीरे बंद करण्याची वेळ आली, हे सत्य समोर असताना अंधश्रद्धेत गुरफटलेला माणूस त्यातून बाहेर पडताना दिसत नाही.

             आज पर्यावरण दिन साजरा केला जात असताना असंख्य महिला वडाच्या तोडून आणलेल्या फांद्याभोवती फेऱ्या मारणार. परंतु यातून फायदा काय ? तर झाडांची मोठ्या प्रमाणावर होणारी तोड. विकासाच्या गाडीत विनाशाचा आलेख वाढत असताना झाडे तोडणे चालू आहे. आपण २१ व्या शतकात वावरत आहोत. विज्ञानाच्या जोरावर मानवाने अथक प्रगती केलेली आहे. मंगळ ग्रह असलेल्या मुलीसोबत लग्न केले जात नाही, परंतु त्या मंगळावर मनुष्य पोहोचला आहे. याचा विचार करता आपल्या ज्ञानाच्या आधार रूढी आणि परंपरा तपासून पहाण्याची नितांत गरज निर्माण झालेली आहे. परंपरांच्या जोखडात न अडकता, विज्ञानाचा अंगीकार करण्याची गरज आहे.

              कथेनुसार विचार केला तर सावित्री स्वतःचा वर स्वतः शोधण्यासाठी वृद्ध आमत्यासह निघते. त्यावेळेस सावित्री जंगलातून छात असताना ज्याचे राज्य गेलेले असते. अशा परागंदा झालेल्या सत्यवान राज्यासोबत ती लग्न करायचे ठरते. परंतु लग्न प्रत्यक्षात होत असताना नारद येतो आणि तो म्हणतो तुझ्या मुलीचा नवरा मरणार आहे. तरी ती लग्न करते. पुढे यम येतो आणि तो सत्यवानाला घेऊन जाऊ लागतो. परंतु ती त्याच्या मागे जातो आणि ती यमाकडे तीन वर मागते. यम तथास्तु म्हणतो. परंतु या कथेचा विचार केला तर एखाद्या राज्याचे राज्य गेलेले आहे. आताच्या आधुनिक युगाचा विचार केला तर अशा व्यक्तीसोबत एखादा बाप लग्न लावून देईल का? या सर्व परंपरेचा विचार केला पाहिजे.

            मी ज्या गावातून येतो. त्या गावात मला आठवते की, मी इयत्ता ३-४ पर्यंत एकही महिला वटसावित्रीचे व्रत करत नव्हते. परंतु एक शहरामध्ये नोकरीला असणारी, शिकलेली आणि शहरात रहाणारी महिला जेव्हा हे व्रत करू लागली. तेव्हा काही महिला ह्या तिचे पाहून व्रत करू लागल्या. म्हणजे वटसावित्रीचे व्रत का करतात, ती कथा काय आहे. हे माहिती नसतानाही त्या व्रत करत होत्या. मला अजून एक नमूद करावेसे वाटते, आमच्या गावातील एक महिला जिचा नवरा प्रचंड दारूडा आहे. तो तिला मारहाण करतो, शिवीगाळ करतो, दररोज भांडण असते. परंतु तरीही ती महिला वटसावित्रीचे व्रत करते. म्हणजे रूढी परंपरांंची गुलामी इतकी रूजली आहे की ती स्रियांची पाठ सोडताना दिसत नाही. स्रियांच्या सुध्दा यामध्ये प्रचंड गुरफटलेल्या आहेत. सुरक्षित स्री सुध्दा या बाबींचा विचार करताना दिसत नाही.

            वडाच्या झाडाला फेऱ्या मारून जर प्राण वाचले असते, तर डॉक्टर आणि वैद्यकीय शिक्षणाची गरज निर्माण झाली नसती. आज याचा विचार करण्याची गरज आहे.

             जागतिक पर्यावरण दिन साजरा वटपौर्णिमा साजरी करत असताना वडाच्या झाडाचे महत्त्व जाणून घेतले पाहिजे. वडाचे झाड लावले पाहिजे. फेऱ्या मारून काही होणार नाही. जर वाटाच्या झाडाखाली जर शांत बसला तर मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन मिळेल. वड हे दीर्घायुषी झाड आहे. 

वडाच्या झाडामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण जास्त असल्याने सर्वांनी या झाडाच्या सानिध्यात राहणे चांगले असते. शहराच्या आरोग्यासाठी हे झाड बहुगुणी आहे. शहरात धुळीचे प्रमाण वाढले आहे , परंतु हे धुलिकण शोषून हवा शुद्धीकरणासाठी या झाडाचा मोठा हातभार लागतो. झाडाच्या पानांमागे बघितले तर मोठ्या प्रमाणात धुळीचे कण चिकटून बसलेले असल्याचे दिसून येते. आरोग्याच्या दृष्टीने ही झाड बहुमोल असून त्याची पाने , फळे , फांद्या , पारंब्यांचा आयुर्वेदात मोठा उपयोग आहे. अशाप्रकारे वडाच्या झाडाचे संगोपन करूयात. रूढी परंपरा न आडकता, आपले आरोग्य उत्तम राखू. कुटुंबातील संवाद चांगला ठेऊ. 

              निसर्गाचा समतोल बिघडलेल्यामुळे पर्यावरणीय समस्या गंभीर होत असताना जागतिक पर्यावरण दिनानिमित्त निसर्ग संवर्धनाचा संकल्प करूयात. रूढी परंपरा ज्ञानाच्या प्रकाशात तपासून पाहूयात! कारण निसर्गाची काळजी आपण घेऊ, निसर्ग ही नक्कीच आपली काळजी घेईल.

नवनाथ मोरे, 

खटकाळे(जुन्नर)

९९२१९७६४६०

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय