सांगली(२२ मे):- सांगली जिल्ह्यातील सांगलीवाडी येथील गावात संभाजीनगर येथे टीम तरुणाई व पृथ्वीराज पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरामध्ये प्रत्येक व्यक्तीची तपासून त्यांचे तापमान पाहण्यात आले. यावेळी त्यांना औषधे मोफत देण्यात आली. कोरोना या आजारावर मात करण्यासाठी प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आयुष्य मिनिस्ट्री ने सुचवलेले होमिओपॅथिक औषध, आर्सेनिक अलबम ३० (Arsenic Alb.30) हे औषध देखील मोफत देण्यात आले.
यावेळी पृथ्वीराज पाटील फौंडेशन चे संस्थापक पृथ्वीराज पाटील, टीम तरूणाई चे सांगली जिल्हा समन्वयक सुनिल आक्काताई लक्ष्मण, कृष्णाथ खाडे, डॉ संजय पाटील, विनायक माने, आकाश पाटील, अमोल कराडे आदीसह उपस्थित होते.