Saturday, May 11, 2024
Homeग्रामीणराज्यातील सर्व विद्यार्थ्यांना तात्काळ शिष्यवृत्ती वाटप करा - एसएफआय

राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना तात्काळ शिष्यवृत्ती वाटप करा – एसएफआय

अमरावती(प्रतिनिधी) :- स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य कमिटीच्या वतीने आज संपूर्ण महाराष्ट्रात शिष्यवृत्ती या मागणीला घेऊन आंदोलन केले. लाँकडाउनच्या काळात अनेक विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. अमरावती जिल्ह्याने आंदोलन करत शिष्यवृत्ती त्वरित वाटप करण्याची मागणी केली.

          लॉकडाऊनच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना तात्काळ शिष्यवृत्ती वारप करावी. आणि स्वाधार योजनेची रक्कम त्वरित विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करावे, आंदोलन करण्यात आले.

         यावेळी SFI राज्य कमिटी सदस्य राजगुरू शिंदे, जिल्हा सचिव विशाल शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष चेतन साळवानस योगेश महाले, मयुरी चौकी, गौरी देवतळे, अंकुश खोबरागडे, रियान शेख आदी उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय