Friday, May 10, 2024
Homeग्रामीण'एसएफआय'चे शिष्यवृत्तीच्या विविध प्रश्नाला घेऊन आंदोलन ; केल्या या महत्वपूर्ण मागण्या.

‘एसएफआय’चे शिष्यवृत्तीच्या विविध प्रश्नाला घेऊन आंदोलन ; केल्या या महत्वपूर्ण मागण्या.

प्रतिनिधी :- स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया जालना जिल्हा कमिटीच्या विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांंना घेऊन आंदोलन करण्यात आले.

               आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांना थकीत शिष्यवृत्तीचे त्वरित वितरण करा, विद्यार्थ्यांच्या खात्यावर स्वाधार योजनेची रक्कम त्वरित जमा करा, ‘सारथी’ संशोधक विद्यार्थ्यांच्या खात्यावर तात्काळ फेलोशिपचे पैसे जमा करा आदी मागण्या करण्यात आल्या.

             लॉकडाऊन काळात सरकारकडे सतत मागणी केली की, राज्यातील सर्व समाज घटकातील, सर्व अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काची शिष्यवृत्ती वितरित करा. तरी देखील सरकारने या मुद्द्याकडे लक्ष दिलेले नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे, म्हणून एसएफआयने आज १ जून रोजी राज्यभरात एकाच दिवशी आंदोलन करण्याची हाक सर्व विद्यार्थ्यांना आणि संघटनेच्या जिल्हा समित्यांना दिली होती. या आंदोलनाला जिल्ह्यात सकारात्मक प्रतिसाद देत, विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन विविध मागण्या केल्या.

           उद्या दिनांक २ जुन रोजी सकाळी ११ वाजेपासून सामाजिक न्याय मंत्र्यांना राज्यातील विद्यार्थी मेसेज करतील आणि त्यातून शिष्यवृत्ती वाटप करण्याची मागणी करतील. तसेच त्याच दिवशी संध्याकाळी ५ ते ७ यावेळेत ट्विटरवर हॅशटॅगचा वापर करून एक मोहीम चालवली जाणार आहे, असल्याचे सांगण्यात आले.

            या आंदोलनात एसएफआय चे राज्य उपाध्यक्ष अनिल मिसाळ, आनंद वाकळे, राहुल हनवते, पवन दांडगे, शंकर डोईफोडे, मुजीब शेख, सोहेल शेख आदीसह विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय