Saturday, May 11, 2024
Homeग्रामीण'एसएफआय' औरंगाबादचे विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना घेऊन आंदोलन

‘एसएफआय’ औरंगाबादचे विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना घेऊन आंदोलन

प्रतिनिधी :- स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया औरंगाबाद जिल्हा कमिटीच्या विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांंना घेऊन आंदोलन करण्यात आले.

               आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांना थकीत शिष्यवृत्तीचे त्वरित वितरण करा, विद्यार्थ्यांच्या खात्यावर स्वाधार योजनेची रक्कम त्वरित जमा करा, ‘सारथी’ संशोधक विद्यार्थ्यांच्या खात्यावर तात्काळ फेलोशिपचे पैसे जमा करा, ‘BARTI’ च्या ३०८ विद्यार्थ्यांना तात्काळ फेलोशिप मंजूर करा,  ‘स्वयम’ योजनेची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, शिष्यवृत्ती रक्कमेत वाढ करा आदी मागण्या करण्यात आल्या.

          लॉकडाऊन काळात सरकारकडे सतत मागणी केली की, राज्यातील सर्व समाज घटकातील, सर्व अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काची शिष्यवृत्ती वितरित करा. तरी देखील सरकारने या मुद्द्याकडे लक्ष दिलेले नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे, म्हणून एसएफआयने आज १ जून रोजी राज्यभरात एकाच दिवशी आंदोलन करण्याची हाक सर्व विद्यार्थ्यांना आणि संघटनेच्या जिल्हा समित्यांना दिली होती. या आंदोलनाला जिल्ह्यात सकारात्मक प्रतिसाद देत, विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन विविध मागण्या केल्या.

            उद्या दिनांक २ जुन रोजी सकाळी ११ वाजेपासून सामाजिक न्याय मंत्र्यांना राज्यातील विद्यार्थी मेसेज करतील आणि त्यातून शिष्यवृत्ती वाटप करण्याची मागणी करतील. तसेच त्याच दिवशी संध्याकाळी ५ ते ७ यावेळेत ट्विटरवर हॅशटॅगचा वापर करून एक मोहीम चालवली जाणार आहे, असल्याचे सांगण्यात आले.

            या आंदोलनात एसएफआय चे राज्य उपाध्यक्ष सुनिल राठोड, राज्य सहसचिव नितीन व्हावळे जिल्हा अध्यक्ष लोकेश कांबळे, सत्यजित मस्के, मोनाली अवसरमल आदीसह विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय