Friday, May 17, 2024
Homeराज्यकेरळचे वैद्यकीय पथक महाराष्ट्रात दाखल; केरळ ठरलंय दिशादर्शक मॉडेल.

केरळचे वैद्यकीय पथक महाराष्ट्रात दाखल; केरळ ठरलंय दिशादर्शक मॉडेल.

प्रतिनिधी :- केरळ सरकारला कोरोना रोखण्यात यश आलेले आहे. देशातील काही राज्यांनी केरळच्या आरोग्य मंत्र्यांसोबत कशाप्रकारे उपाय केले जावेत, यासाठी संवाद साधला होता. महाराष्ट्र सरकारने केरळकडे वैद्यकीय मदत मागितली होती.

         केरळ सरकारने १०० सदस्यांचे वैद्यकीय पथक टीव्हीएम मेडिकल कॉलेजचे अधिक्षक डॉ. संतोष कुमार यांच्या नेतृत्वाखाली मुंबईला पाठवल्याचे केरळचे अर्थमंत्री थॉमस इसाक यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे. सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये टीम पोहोचल्याचे त्यांनी म्हटले आहे.

         कोरोनाच्या कठीण परिस्थितीत सर्वाधिक रूग्ण असलेल्या महाराष्ट्राच्या मदतीसाठी केरळ सरकार पुढे आले आहे. परंतु थॉमस इसाक यांनी म्हटले आहे की कुठलेली सिमा नसलेले हे डॉक्टर आहेत. 

        कम्युनिस्ट क्युबाच्या आरोग्य सेवेची चर्चा जगभर होत असताना आता कम्युनिस्ट सरकार असलेल्या केरळने पण एक नवा आदर्श रचला आहे. केरळकडून हा आदर्श येणाऱ्या काळात महाराष्ट्र पण घेईल. 

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय