Friday, November 22, 2024
Homeग्रामीणठाणे शहरात वनजमिनीच्या प्रश्नाला घेऊन आदिवासींची निदर्शन

ठाणे शहरात वनजमिनीच्या प्रश्नाला घेऊन आदिवासींची निदर्शन

प्रतिनिधी :- आदिवासींंच्या वनजमिनीच्या संदर्भात अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली वनखात्याच्या कार्यालयावर निदर्शने करण्यात आली.

           ठाणे शहरातील येऊरच्या डोंगरावर वर्षानुवर्ष शेती करणाऱ्या आदिवासींना वनखात्याने अत्यंत मग्रुरीने दमदाटी करून ते कसत असलेल्या वनपट्ट्यांवर नांगर फिरवण्याचा प्रयत्न केला. कोरोनामुळे आधीच मेटाकुटीला आलेल्या गोरगरीब आदिवासींना उपजीविकेकरता मिळणारा हा काडीचा आधारही नष्ट होताना पाहून हे सर्व आदिवासी शेतकरी लॉकडाऊन असूनही किसान सभेच्या लाल झेंड्याखाली एकत्र आले आणि थेट येऊर येथील वनखात्याच्या कार्यालयावर धडकले. किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांच्या नेतृत्वाखाली काल ५ जूनला वनाधिकाऱ्यांना भेटून ही कारवाई ताबडतोब थांबवण्याची मागणी किसान सभेने केली आणि २५/३० वर्षांपासून हे आदिवासी येथे राहात असून शेती करत असल्याचे पुरावे सादर केले.

           यानंतर झालेल्या सभेत शहरी भागातील अशा सर्व आदिवासींना एकत्र करून किसान सभा, सभेच्या झेंड्याखाली एकजूट होऊन संघर्ष पुढे नेण्याचा निर्धार या सर्व आदिवासींनी केला. यावेळी जनवादी महिला संघटनेच्या राज्य सचिव प्राची हातिवलेकर, ठाणे शहरातील किसान सभेचे नेते दत्तू खराड यांनीही उपस्थितींंना संबोधित केले. 

        यावेळी दत्तू खराड, किशोर खराड, शंकर डवले, राजू कडू, सुमन वाघ, अनिता लहांगे आदीसह उपस्थित होते.

संबंधित लेख

लोकप्रिय