Friday, May 10, 2024
Homeग्रामीणमाजलगाव येथे सिटू संघटनेचा सुवर्णमहोत्सव दिन साजरा

माजलगाव येथे सिटू संघटनेचा सुवर्णमहोत्सव दिन साजरा

माजलगाव(प्रतिनिधी):- माजलगाव येथे सिटूया कामगार संघटनेचा सुवर्ण महोत्सव दिन लॉकडाऊनमध्ये ही शारीरिक अंतर पाळुन साजरा करण्यात आला.

               माकपचे सचिव व जेष्ठ कामगार नेते कॉ. मुसद्दीक बाबा म्हणाले की, ३० मे  १९७० रोजी कोलकता येथे सिटू संघटनेची स्थापन झाली. या संघटनेचे पहिले अध्यक्ष म्हणून कॉम्रेड बी.टी. रणदिवे निवडले गेले व सरचिटणीस म्हणून कॉ.पी.रामामुर्ती, कॉ. ज्योती बसु अनेक दशके सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहिले. महाराष्ट्रात एस.वाय कोल्हटकर, पी.के. कुरणे, प्रभाकर संझगिरी, कृष्णा खोपकर,  के.एल मालाबादे, प्रभाकर मानकर, पी.के कश्यप इत्यादी सिटूचे आघडीचे नेते राहिले आहेत. यावेळी हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले.

               यावेळी सर्व कामगारांना प्रतिमहा न्युनतम वेतन रु.२४००० मिळालेच पाहिजे, असंघटित प्रवासी कामगारांना दरमहा १०००० लॉकडाऊन पिरीयड भत्ता मिळालाच पाहिजे, केंद्र व राज्य सरकारने कामगार कायदे स्थगित करण्याचे निर्णय त्वरित रद्द करावे, या मागण्या करण्यात आल्या.

         यावेळी शिवाजी कुरे, सय्यद याकुब, रूपेश चव्हाण, विनायक चव्हाण, मज्जहर देशमुख,सय्यद आली, सुरेश चव्हाण, शेख मुसतकिम, दिपक चव्हाण, सय्यद गुलाब, महेश कन्नाडे, स.फारुख, सुमित वोहाळ आदी कार्यकर्ते उपस्थित होते

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय