Friday, November 22, 2024
Homeआरोग्यकोरोनाझी न्यूजच्या स्टुडिओ मध्ये कोरोनाचा शिरकाव केली इमारत सील

झी न्यूजच्या स्टुडिओ मध्ये कोरोनाचा शिरकाव केली इमारत सील

 मुंबई (प्रतिनिधी):-

     देशभरात कोरोना संसर्गाच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. कोरोनाने झी न्यूजच्या मीडिया मध्ये हि शिरकाव केला आहे. नोएडामधील झी न्यूजच्या मीडिया इमारतीला सील करण्यात आले आहे. कोरोनाची प्रकरणे देशभर झपाट्याने वाढत आहेत, कोरोनापासून बचाव हा एकमेव मार्ग आहे. परंतु झी न्यूजच्या दुर्लक्षामुळे मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे बोलले जाते आहे.

     काही दिवसापासून झी न्यूजचे संपादक आणि मुख्य सुधीर चौधरी ट्विटरवर कोरोना संक्रमणाच्या विषयावर ट्रेंड करीत आहेत. या दरम्यान वकील प्रशांत भूषण आणि सुधीर चौधरी यांच्यात सोशल मीडियावर भीषण वादविवादही पाहायला मिळाला. यावेळी झी न्यूजचे कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी सुधीर चौधरी यांनी फेटाळली होती. इतकेच नव्हे तर सुधीरने त्यास तुकडे तुकडे गॅंगने कट रचल्याचे म्हटले होते. यापूर्वी दिल्लीतील तबलीगी जमातच्या बाबतीत सुधीरने जिहाद हा शब्द वापरला होता. याची आठवण करून देत सुधीरला आता ट्रोल मोठ्या प्रमाणावर केले जात आहे. 

    प्रशांत भूषण यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, झी न्यूजच्या सर्व कर्मचार्‍यांची इच्छा आहे की त्याची चाचणी घ्यावी आणि त्यांनी घरी काम करावे आणि केवळ आवश्यक लोकच कार्यालयात यावेत.  पण सुधीर चौधरी त्यांचे म्हणणे ऐकत नाहीत आणि त्याने सर्वांना धमकावून सांगितले की मला उद्यापासून हे ऐकायला नको आहे की कोणाला ताप आहे, कुणाला खोकला आहे.

      आता ही बाब चव्हाट्यावर आली असून झी न्यूजमध्ये आतापर्यंत 29 लोकांची कोरोनाची लागण झाल्याचे सुधीर चौधरी यांनी त्यांच्या प्राईम टाइम मध्ये सांगितले आहे. त्याचवेळी 400 कर्मचार्‍यांपैकी 252 कर्मचार्‍यांना घरीच अलग ठेवण्यात आले. कोरोनामुळे नोएडा मधील झी न्यूजची इमारत सील केल्यामुळे त्यांना एका छोट्याशा स्टुडिओ मधून काम करावे लागत असल्याचे सुधीर चौधरी यांनी सांगितले.

संबंधित लेख

लोकप्रिय