Saturday, April 27, 2024
Homeशिक्षणवडवणीतील जि.प.शिक्षकाच्या आयआयटीयन मुलाने करुन दाखवले कोटा राजस्थान पॅटर्नचे धडे...

वडवणीतील जि.प.शिक्षकाच्या आयआयटीयन मुलाने करुन दाखवले कोटा राजस्थान पॅटर्नचे धडे बीड जिल्ह्यातील विद्यार्थीही आॅनलाईन गिरवू लागले

(वडवणी/प्रतिनिधी) देशातील मोठ-मोठ्या मल्टिनॅशनल कंपनीच्या आलेल्या नौकरीच्या संधीला नाकारत आपल्या बीड जिल्ह्यातील आयआयटी व नीट करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनाही राजस्थानातील कोटा पॅटर्नप्रमाणे शिक्षण मिळावे याकरिता वडवणी येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक भगवान खाटोकर यांचे चिरंजीव इंजिनीयर प्रशांत खाटोकर यांनी बीड जिल्ह्यासह इतर ठिकाणच्याही सर्व विद्यार्थ्यांना आयआयटी व नीटच्या तयारीकरिता ऑनलाइन शिक्षणाचे माध्यम सध्या सुरु केले असून त्यांच्या या कल्पनेला विद्यार्थ्यांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान कोटा पॅटर्नचे धडे घरबसल्या बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन मिळू लागल्याने विद्यार्थी व पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.

                   

       याबाबत अधिक माहिती अशी की, पूर्वी बीड शहरातील व जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना नीट व आयआयटीच्या तयारीसाठी लातूर, नांदेड, औरंगाबाद, पुणे किंवा कोटा राजस्थान याठिकाणी जाण्याची आवश्यकता भासायची. हीच बीड जिल्ह्याची अडचण व गरज लक्षात घेता वडवणी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व सध्या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक मुलींची शाळा वडवणी येथील प्रभारी केंद्रीय मुख्याध्यापक भगवान खाटोकर यांचे चिरंजीव इंजिनीयर प्रशांत खाटोकर यांनी देशातील मोठ-मोठ्या मल्टिनॅशनल कंपनीच्या आलेल्या नौकरीच्या संधीला नाकारत आपल्या बीड जिल्ह्यातील आयआयटी व नीटची तयारी करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनाही कोटा पॅटर्नप्रमाणे शिक्षण मिळावे याकरिता बीड शहरातील उमा किरण शेजारी, पांगरी रोड, बीड या ठिकाणी सिनर्जी फिजिक्स या नावाची अकॅडमी सुरु केली आहे.

       परंतु सध्या कोरोनाच्या अनुषंगाने याठिकाणी प्रत्यक्ष ऑफलाईन शिक्षणास बंधने असल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यास सुरुवात झालेली आहे. त्यांच्या या कल्पनेला विद्यार्थ्यांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान कोटा पॅटर्नचे धडे घरबसल्या बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन मिळू लागल्याने विद्यार्थी व पालकांनी समाधान व्यक्त केले आहे. इंजिनीयर प्रशांत खाटोकर यांनी बी.टेक हे आयआयटी मद्रास याठिकाणी शिक्षण पूर्ण केलेले असून त्यांचे प्राथमिक शिक्षण हे वडवणीच्या जिल्हा परिषद शाळेत झाले आहे तसेच इयत्ता सहावी ते दहावीचे शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय गढी, गेवराई या ठिकाणी पूर्ण झाल्यानंतर अकरावी व बारावीचे शिक्षण कोटा राजस्थान या ठिकाणी पूर्ण केले. बारावी नंतर त्यांनी आयआयटी मद्रास या ठिकाणी प्रवेश घेतला व आपल्या अचाट बुध्दीमत्तेच्या बळावर त्या ठिकाणी उत्तुंग यश संपादित केले.

       शिक्षण घेत असतानाच त्यांच्या बुध्दीमत्तेचा अंदाज देशातील विविध नामांकित कंपन्यांनी घेत त्यांना नौकरीसाठी देशातील विविध मोठमोठ्या मल्टिनॅशनल कंपनींच्या वतीने मोठ्या ऑफर देण्यात आल्या होत्या. परंतु लाखो रुपयांच्या नौकरीच्या संधीला नाकारत त्यांनी आपली आवड शिक्षण क्षेत्रामध्ये असल्यामुळे व बीड जिल्ह्याचीही गरज लक्षात घेता त्यांनी स्वतःच्याच बीड जिल्ह्यात आयआयटी व नीट यामध्ये विद्यार्थ्यांना परिपक्व मार्गदर्शन करण्याच्या हेतूने सिनर्जी फिजिक्स या नावाची अकॅडमी सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाचा बीड जिल्ह्यातील व विशेषतः ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार असून आता बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना घरबसल्या कोटा राजस्थान पॅटर्नचा अभ्यासक्रम शिकावयास मिळणार आहे. तरी ज्या विद्यार्थ्यांना नीट व आयआयटीच्या अभ्यासक्रमांची तयारी करावयाची आहे अशांनी सिनर्जी फिजिक्सच्या सिनर्जी फिजिक्स हे ॲप प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करून घ्यावे. त्याचबरोबर सिनर्जी फिजिक्स डॉट इन या वेबसाईटला भेट द्यावी. किंवा ९१३०३५११७७ या क्रमांकावर संपर्क साधून आॅनलाईन शिक्षणासाठी आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन इंजिनीयर प्रशांत खाटोकर यांनी केले आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय