Friday, November 22, 2024
Homeग्रामीणकोल्हापूर जिल्हा कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना या प्रश्नांची सरबत्ती करत दिले निवेदन

कोल्हापूर जिल्हा कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना या प्रश्नांची सरबत्ती करत दिले निवेदन

कोल्हापूर(प्रतिनिधी) :- सध्या जगभरामध्ये कोरोना विषाणू संसर्गामुळे मानवी जनजीवन विस्कळीत झाले. संपलेल्या शैक्षणिक वर्षाच्या शेवटच्या टप्प्यातील अनेक शैक्षणिक उपक्रम रद्द करावे लागले आहेत. अशा परिस्थितीत आजही देशामध्ये लॉकडाऊन आहे. भविष्यामध्ये या लॉकडाऊनची काय अवस्था असेल सांगता येत नाही. हा विषाणूचा संसर्ग लवकर आटोक्यात येईल याची शाश्वती नाही. नवीन शैक्षणिक वर्ष जून २०२० पासून सुरु होत आहे. या वर्षात शिक्षण पध्दती कशाप्रकारे असणार याच्या अनेक शंका नागरिक, पालक , विद्यार्थी, शिक्षक यांच्यामध्ये निर्माण झाल्या आहेत. म्हणून आम्ही खाली दिलेल्या मुद्यांवर शासन कोणत्या उपाययोजना करणार आहे याची माहिती देऊन सहकार्य करण्याची विनंती करणारे पत्र कोल्हापूर जिल्हा कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी रमेश मोरे, अशोक पवार, अँड.पंडित सडोलिकर आदीसह उपस्थित होते.

निवेदनातील मुद्दे :- 


१. शैक्षणिक वर्षात एकूण कामकाज किती दिवस व सुट्ट्या किती दिवस ? 

२.  शैक्षणिक वर्षात एकूण परिक्षा किती ?

३. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ केव्हा चालू होणार.

४. या शैक्षणिक वर्षातील सुट्ट्या अधिक असलेने दिवस भरुन काढणेसाठी काय उपाय योजना करणार ? 

५. शाळा सुरु करणेपूर्वी काय खबरदारी / उपाययोजना करणार ? शालेय विद्यार्थी व पालकांसाठी कोणती सुरक्षा / उपाय योजना करणार ? 

६. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ ची सर्व माध्यमांची शालेय फी कशी ठरविणार ? भविष्यात ऑनलाईन शिक्षण पध्दती वापर वाढण्यासाठी काय उपाययोजना करणार? 

 ९. कोरोना संकट वाढलेच तर शैक्षणिक वर्ष कसे धरणार / किती % अभ्यासक्रम राबविणार ? तसेच खाजगी क्लासेस संदर्भात शाळेप्रमाणे नियमावली राबविणेसाठी खाजगी क्लासेस संघटनेशी पत्रव्यवहार व्हावेत.

१०. विद्यार्थी वाहतुकी संदर्भात कोणती नियमावली राबवणेत येणार याची अमंलबजावणी करणेसाठी काय उपाययोजना राबवल्या जाणार. 

११. इयत्ता १ ली च्या वर्गात चालू होणाऱ्या शैक्षणिक वर्षात आर.टी.ई. कायद्यानुसार ३० पटांचा १ वर्ग तुकडी असते . त्याचप्रमाणे निदान यंदा कोरोनाच्या पार्श्वभुमीवर त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे . अशी अंमलबजावणी न करणाऱ्या शिक्षण संस्थावर शासन काय कारवाई करणार याची आम्हाला लेखी माहिती द्यावी. शैक्षणिक वर्ष सुरु करण्यापूर्वी २१ दिवस आधी सर्व माहिती लेखी स्वरुपात सर्व पालकांपर्यंत पोहोचणेची व्यवस्था व्हावी. याची विस्तृत माहिती शासनाबरोबर झालेल्या पत्रव्यवहारांबाबत समितीची बैठक घेवून लवकरात लवकर जाहीर करुन सहकार्य करावे. नेहमीच्या शैक्षणिक वर्षातील कामकाज परिक्षा व सुट्ट्यांचा तपशिल सोबत जोडला आहे. 

१२. निर्जंतुकीकरण, स्वच्छता मोहीम, हॅण्डवॉश स्टेशन, सॅनिटायझर स्टेशन,  पालक जागृती मेळावा, माहिती पत्रके, मास्क वाटप विद्यार्थ्यांना कधी करणार? सर्व साहित्य सरकार पुरविणार का ?

१३. एका वर्गात विद्यार्थी पटसंख्या किती बसविणार? वर्गरचना सोशल डिस्टन्स प्रमाणे शक्य आहे का ?

१४.  सन २०१९ -२० व सन २०२०-२१ हे दोन वर्षातील शैक्षणिक वर्ष कोरोना संकटामुळे शालेय कामकाजाचे दिवस कमी भरलेत . मग सर्व माध्यमांची (विशेष इंग्रजी मेडीयम) वार्षिक शालेय फी कमी करणार का ?

१५. शाळा कमी भरलेने ऑनलाईन शिक्षण पध्दतीवर जोर वाढत आहे. पण ग्रामीण भाग व शहरातील आर्थिक परिस्थिती नसलेल्या पालकांच्याकडे स्मार्टफोन मोबाईल व टि.व्ही. उपलब्ध नसलेस या घटकांना ऑनलाईन अभ्यासक्रम मिळणेसाठी काय उपाययोजना करणार ?

१६. जर कोरोना संकट वाढले तर आगामी शैक्षणिक वर्ष कसे धारणार १/२ टर्म का ? अभ्यासक्रम किती टक्के राबविणार ? परिक्षा किती होणार ? याबाबत शासन स्तरावर काय नियोजन असणार / याची तयारी काय ?


संबंधित लेख

लोकप्रिय