---Advertisement---
अमरावती(प्रतिनिधी):- सेंटर ऑफ ट्रेंड युनियन(सिटू) च्या सुवर्णमहोत्सवी दिनानिमित्त अमरावती जिल्ह्यात अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या विविध ठिकाणी कार्यक्रम पार पडले.
अमरावती जिल्ह्यातील वबडनेरा शहरामध्ये १५ ठिकाणी कार्यक्रम पार पडले. तसेच स्वाभिमानी विद्युत कामगार संघटनेने सुध्दा या कार्यक्रमात भाग घेतला.
यामध्ये सुभाष पांडे, रमेश सोनुले, सुनील देशमुख, चंदा वानखडे, आशा वैध, निलू मेश्राम, रेहाना यास्मिन, राजेंंद्र भांभोरे, पद्माताई गजभिये, सफिया खान, लता मावदे, हेमा गौड आदीसह अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाल्या होत्या.