वडवणी:-(प्रतिनिधी)वडवणी येथील महाराणी ताराबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात 22 जून सोमवार रोजी सकाळी दहा वाजता पाचवी ते आठवी पर्यंतच्या सर्व पालकांची बैठक संपन्न झाली या बैठकीचे प्रमुख या विद्यालयाचे मुख्याध्यापक राऊत सर होते
यावेळी या बैठकीसाठी जवळपास 60 ते 70 पालक उपस्थित होती covid-19 या विषाणूजन्य परिस्थितीला सामोरे जाताना शाळेचे कर्तव्य काय आहे? शिक्षकांचे कर्तव्य काय ?मुख्याध्यापकांचे काय कर्तव्य आहे? तर पालकांची काय जबाबदारी आहे? या सर्व प्रकरणावर सविस्तर चर्चा संपन्न झाली .
यावेळी मार्गदर्शन करताना मुख्याध्यापक राऊत डी.डी.म्हणाले करुणा महामारी च्या संसर्गामुळे हे शैक्षणिक वर्ष विद्यार्थ्यांसाठी अतिशय हलाखीचे व जोखीम पूर्ण आहे यासाठी पालकांनी जबाबदारी पूर्ण आपल्या पाल्यास सांभाळणे, सूचना देणे आवश्यक आहे. आपला पाल्य शाळेत येताना मास्क चेहऱ्यावर लावून येतो की नाही. आपल्याकडे वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष देणे आवश्यक आहे. प्रत्येक वेळी डेटॉलने हात धुने आवश्यक आहे .वारंवार मुलांनी नाकाला, कानाला व डोळ्यांना आपल्या हाताचा स्पर्श होईल होणार नाही याची प्रकर्षाने दखल घेतले पाहिजे. यासाठी सर्वसामान्य ज्या सूचना आहेत त्या पालकांनी आपल्या मुलांना मुलींना सांगितल्या पाहिजेत .
विद्यार्थ्यांनी शाळेत येताना गर्दी करता क्रमाने व गर्दीत शिरता कामाने शाळेत येताना स्कूल बस एसटी बस सीटावर चालणारी जीप अशा वाहनाने प्रवास करणे टाळावे. शक्यतो पालकांनी आपल्या स्वतःच्या गाडीवर विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचते करावे जर विद्यार्थ्याकडे ये-जा करण्यासाठी सायकल उपलब्ध होईल तर ते अधिक उत्तम .
आपल्या पाल्यास वारंवार खोकला येत असेल ताप येत असेल तर विनाविलंब जवळच्या शासकीय दवाखान्यात नेऊन तपासणी करून घेणे आवश्यक आहे . तसेच त्याचा तो खोकला ताप बरा होईपर्यंत शाळेत पाठवू नये . अशा प्रकारचे विचार व सूचना या बैठकीमध्ये प्राचार्य राऊत डी.डी यांनी व्यक्त केल्या.
यावेळी कोरोना महामारीच्या अनुषंगाने पालकांनी अनेक समस्या समोर व्यक्त केल्या .जर शिक्षकच बसने ये-जा करत असेल मुख्यालयी राहत नसेल तर आमच्या पाल्याचे काय ?
जर शिक्षकच संसार्गाचा बळी असेल तर आमच्या विद्यार्थ्यांचे काय ?शाळेत डेटॉल सॕनिटायझर ची सोय आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना एक बेंच याप्रमाणे बसण्यासाठी सुविधाही उपलब्ध असली पाहिजे अशा प्रकारच्या सूचनाही यावेळी पालकांनी व्यक्त केल्या, यावेळी उपमुख्याध्यापक मस्के ए आर, पर्यवेक्षक पी एम धाईतिडक, विज्ञान शिक्षक चांदणे सर, राऊत एम बी , बी पी चोले,कुलकर्णी एस ए., पवार के जी , श्रीमती नलावडे मॅडम ,श्रीमती फलके ,मॅडम श्रीमती गरकळ मॅडम ,श्रीमती दंदे मॅडम ,तांबडे सर इ. प्रचंड शिक्षकवृंद यावेळी उपस्थित होते.