Thursday, May 2, 2024
Homeग्रामीणमहावितरणमधील विद्युत सहाय्यक व उपकेंद्र सहाय्यकांची पदे त्वरित भरा अन्यथा उपोषणाचा इशारा...

महावितरणमधील विद्युत सहाय्यक व उपकेंद्र सहाय्यकांची पदे त्वरित भरा अन्यथा उपोषणाचा इशारा , विद्यार्थ्यांकडून तहसीलदारांना निवेदन

परळी ( प्रतिनिधी) :- महावितरणमधील विद्युत सहाय्यक मापकेंद्र सहाय्यक पदाची भरती त्वरित करावी अन्यथा उपोषण करावे लागेल, असा इशारा विद्यार्थ्यांनी तहसीलदारांना निवेदनाद्वारे दिला आहे.

तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  ऊर्जा विभागामार्फत विद्युत सहाय्यक पदाची या उपकेंद्र सहायक पदाची भरती प्रक्रिया राबविण्यात आली त्यात विद्यार्थ्यांकडून विहित नमुन्यात अर्ज सादर करण्यात आली तसेच त्यांची आयपीपीएस नामांकित कंपनीकडून मुलाखत घेऊन तब्बल बारा महिने उलटले असून याची मात्र ऊर्जा मत्र्यांनी दखल घेतलेली नाही. महाराष्ट्र राज्य ऊर्जा विभागाने विद्युत सहाय्यक पदासाठी जाहिरात क्रमांक ४/२०१९ व उपकेंद्र सहाय्यक पदासाठी जाहिरात क्रमांक ४/२०१९ अशी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली व २५/८/२०१९ रोजी या दोन्ही पदांची आयबीपीएस या नामांकित कंपनीकडून परीक्षा घेण्यात आली. मात्र अजून सुद्धा याबाबत ऊर्जा विभागाकडून कसल्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही.

याबाबत लवकरात लवकर ऊर्जा विभागाकडून त्यारित कारवाई व्हावी अन्यथा १ जुलै पासून तहसील कार्यालयासमोर उपोषण करावे लागेल असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री व ऊर्जा मंत्री यांना पाठविण्यात आल्या आहेत.

यावेळी दीपक द्वाकाणे, विठ्ठल गीते, अशोक गीते, ईशर आचार्य, हनुमंत होळवे, नरहरी घुगे, संतोष फड, अजित गित्ते, अणुन नागरगोजे, बालासाहेब फळ, संदिपान नागरगोजे, अशोक पाळवदे आदीसह विद्यार्थी उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय