Friday, November 22, 2024
Homeग्रामीणकिसान सभेच्या आंदोलनाला यश

किसान सभेच्या आंदोलनाला यश

         


आंबेगाव (प्रतिनिधी):- 

       रोजगार हमीची कामे सुरू करण्यात टाळाटाळ व आर्थिक गैरव्यवहार करणारे श्री. माने या तांत्रिक अधिकारी यांची बदली करण्यात यावी ही संघटनेची प्रमुख मागणी मान्य झाली, त्यांचा बदली आदेश आज निघाला व 31 तारखेला त्यांना आंबेगाव तालुक्यातून कार्यमुक्त केले जाईल. आज किसान सभेने 8 गावांतील लोकांची कामाची मागणी सादर केली, त्यांना तातडीने काम उपलब्ध करून दिले जाईल असे लेखी आश्वासन मा.गटविकास  अधिकारी यांनी दिले. तसेच यापुढे लोकांनी साध्या अर्जावर जरी काम मागणी केली तरी तातडीने काम उपलब्ध करून दिले जाईल. कायद्याचे पालन करत संघटनेचे अशोक पेकारी,राजू घोडे,डॉ.अमोल वाघमारे व सुनील पेकारी हे कार्यकर्ते आंदोलनाला बसले होते. त्यावेळी प्रांतअधिकारी श्री.जितेंद्र डुडी सर, मा.तहसीलदार श्रीमती रमा जोशी मॅडम, मा.गटविकास अधिकारी श्री.पठारे सर,सहाय्यक गट विकास अधिकारी श्री.लहामटे सर, मा.साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार सर मा.सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री.पंढुरे सर, श्री.भवारी सर, यांच्या समवेत चर्चा झाली.

या होत्या प्रमुख मागण्या

– हाताला काम द्या, 

– मनरेगा सुरू करा,

– भ्रष्ट अधिकारी यांची बदली करा.

किसान सभेचे लोकांना आवाहन 

      मनरेगा च्या माध्यमातून दिवसाला सुमारे 238 रुपये मजुरी आहे. ही कामे गावात सुरू करण्यासाठी साध्या अर्जावर जरी काम मागणी पंचायत समिती कडे केली, तरी प्रशासन आपल्याला काम उपलब्ध करून देणार आहे,असा आज शब्द प्रशासनाने दिला आहे,तरी लोकांनी यासाठी पुढे येण्याचे आवाहन अखिल भारतीय किसान सभाने केली आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय