Sunday, July 7, 2024
Homeताज्या बातम्याLegislative Council : विधान परिषदेच्या पाच जागांसाठी भाजपकडून उमेदवारांची घोषणा

Legislative Council : विधान परिषदेच्या पाच जागांसाठी भाजपकडून उमेदवारांची घोषणा

मुंबई : भारतीय जनता पक्षाने (भाजप) विधान परिषदेच्या पाच जागांसाठी आज उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, डॉ. परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांच्या नावांचा समावेश आहे. भाजपने यादीत चार ओबीसी उमेदवारांना आणि एका दलित उमेदवाराला स्थान दिले आहे. (Legislative Council)

विधानसभेच्या ११ जागा रिक्त असून त्यातील पाच जागा भाजपला मिळणार आहेत. या पाच जागांसाठीच भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपने पंकजा मुंडे यांनाही संधी दिली आहे. त्यांच्यासह सदाभाऊ खोत यांना देखील उमेदवारी दिली आहे. परंतु विधानपरिषदेसाठी इच्छुक असलेल्या रावसाहेब दानवे आणि हर्षवर्धन पाटील यांना भाजपने संधी दिलेली नाही.

तसेच, पिंपरी चिंचवड येथील रहिवासी अमित गोरखे हे भाजपच्या आयटी सेलचे काम पाहतात. ते एका दलित कुटुंबातून येतात. पुण्यातील योगेश टिळेकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे, जे भाजपचे हडपसरचे माजी आमदार आहेत.

पंकजा मुंडेंना विधान परिषदेची (Legislative Council) उमेदवारी

पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे. पंकजा मुंडे यांचे समर्थन करणारा राज्यात मोठा वर्ग आहे. तसेच त्यांना ओबीसी समाजाचा पाठिंबा आहे. यामुळेच ओबीसी मते भाजपकडे वळवण्यासाठी पंकजा मुंडे यांना संधी दिली गेली आहे. लोकसभेत बीडमध्ये शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला. यानंतर आता विधान परिषदेच्या माध्यमातून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

नागपूरमधील दीक्षाभूमी अंडरग्राऊण्ड पार्किंगच्या विरोधात जोरदार आंदोलन, उपमुख्यमंत्र्याकडून कामाला स्थगिती

मोठी बातमी : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेच्या संदर्भात मंत्र्यांनी दिले महत्वाचे निर्देश

धक्कादायक : लिफ्टमध्ये कुत्र्याला वॉकरने मारहाण; सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटना कैद

धक्कादायक ! 19 वर्षीय तरुणाचा झोपेत चालताना सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू!

मोठी बातमी : राज्यातील गट ‘क’ पदांच्या सर्व परीक्षा आता एमपीएसीद्वारे

मोठी बातमी : आजपासून नवे फौजदारी कायदे लागू, वाचा काय होणार बदल !

IDBI : आयडीबीआय बँक अंतर्गत मोठी भरती; आजच करा अर्ज!

ब्रेकिंग : जुलैच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात

नवीन फौजदारी कायद्यांमुळे न्यायव्यवस्थेतील अनुशेष कमी होण्यास मदत होईल – राज्यपाल रमेश बैस

मोठी बातमी : भुशी धरणात एकाच कुटुंबातील ५ जणांचा बुडून मृत्यू, धक्कादायक Video व्हायरल

मोठी बातमी : राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक यांची नियुक्ती, वाचा कोण आहेत सुजाता सौनिक ?

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय