Friday, November 22, 2024
Homeग्रामीणभात पिकांचा विमा हप्ता भराण्याचे बिरसा क्रांती दलाचे आवाहन

भात पिकांचा विमा हप्ता भराण्याचे बिरसा क्रांती दलाचे आवाहन

(पुणे) :- जगभर कोरोनाची महामारी आणि त्यात जुलै महिना संपत असताना सुद्धा पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. त्याच पार्श्वभूमीवर बिरसा क्रांती दलाने राज्यातील शेतकऱ्यांना तसेच आदिवासी बांधवांना, शेतकऱ्यांना, नोकरदारांना भात पिकांचा विमा हप्ता भरण्याची विनंती केली आहे.

        31 जुलै पर्यंत पिक विमा हप्ता भरण्याची मुदत आहे त्यामुळे बिरसा क्रांती दलाने म्हंटले आहे की, गोर गरीब शेतकऱ्याला ऑनलाईन पीक विमा भरण्यासाठी सहकार्य करा. यावर्षी आपण बघतोय पावसाने दडी मारली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची भीती आहे असे बिरसा क्रांती दलाचे पुणे विभागीय अध्यक्ष दिलीप आंबवणे यांनी म्हंटले आहे.

         आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, अकोले या भागांमध्ये अजूनही भात लागवड खोळंबले आहेत. पावसाने दडी मारल्यामुळे भाताचे रोप जागच्या जागी पडून आहेत. शेतकरी हवालदिल झाला असून पाऊस नसल्याने शेतामध्ये गाळ काढता येत नाही, त्यामुळे झुरा वाहत असलेले पाणी वळवून खासर मध्ये गाळ करण्याचं जुगाड केले जात आहे तर कोणी मोटार लावून पाणी उपसत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना भात लागवड करताना कसरत करावी लागत आहे. पहिलेच शेतकऱ्यांचं हिरड्याने कंबरडे मोडले आहे, त्यामध्ये खायचं काय असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय